व्हिडीओमुळे वैतागली आर्ची; म्हटले, ‘ती मी नव्हेच’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 03:47 PM2017-11-10T15:47:41+5:302017-11-10T21:17:41+5:30

सध्या रिंकू राजगुरू अर्थात आर्ची सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. परंतु या चर्चेमुळे ती चांगलीच वैतागली आहे. वाचा सविस्तर !

Video overwhelmed; Said, 'That's not me!' | व्हिडीओमुळे वैतागली आर्ची; म्हटले, ‘ती मी नव्हेच’ !

व्हिडीओमुळे वैतागली आर्ची; म्हटले, ‘ती मी नव्हेच’ !

googlenewsNext
ैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे चर्चेत आलेली आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या प्रचंड चर्चेचा विषय बनली आहे. मात्र ती या चर्चेमुळे आनंदी नसून, अशरश: वैतागली आहे. होय, काही दिवसांपासून आर्चीचा सोशल मीडियावर पाय घसरून पडल्याचा व्हिडीओ वाºयासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर्ची शूटिंग करीत असताना दिसत आहे. नदीच्या किनाºयालगत सुरू असलेल्या या शूटिंगमध्ये डान्सची एक स्टेप करताना आर्चीचा पाय घसरतो अन् ती खाली पडते. आर्चीचा हा व्हिडीओ सध्या असा काही व्हायरल होत आहे की, सोशल मीडियावर पुन्हा एकदा आर्चीची चर्चा रंगू लगाली आहे. 

आर्चीचे चाहते तिचा हा व्हिडीओ लाइक्स तर करीत आहेतच शिवाय शेअर करून इतरांनाही पाठवित आहेत. त्यामुळेच आतापर्यंत हा व्हिडीओ तब्बल बारा हजार लोकांनी बघितला आहे. मात्र आता या व्हिडीओमध्ये एक जोरदार वळण आले असून, व्हिडीओमध्ये दिसत असलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक व्हिडीओमध्ये दिसत असलेली अभिनेत्री ही रिंकू राजगुरू नाही. होय, या संपूर्ण प्रकरणाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन रिंकूचे वडील समोर आले आहेत. त्यांनी या गोष्टीचा स्पष्ट शब्दात खुलासा केला की, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रिंकू नसून, दुसरीच कुठलीतरी अभिनेत्री आहे. 



यावेळी रिंकूच्या वडिलांनी लोकांना अपील केले की, हा व्हिडीओ रिंकू राजगुरूचा नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरविणे बंद करावे. वास्तविक व्हिडीओमध्ये दिसत असलेली अभिनेत्री ही रिंकू राजगुरू नसून, लिंडा कुमार आहे. लिंडा सध्या साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करीत आहे. तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करताना ही घटना घडली. मात्र तिचा चेहरा रिंकू राजगुरूच्या चेहºयाशी साधर्म्य साधणारा असल्याने सोशल मीडियावर आर्ची पडल्याचीच चर्चा रंगत आहे. 

Web Title: Video overwhelmed; Said, 'That's not me!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.