VIDEO:आर्ची पडली रे.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 12:51 IST2017-11-09T07:21:18+5:302017-11-09T12:51:18+5:30
मनसु मल्लिगे हा कन्नड सिनेमा रिंकूने केला. हा कन्नड सिनेमा म्हणजेच सैराटचा रिमेक होता. मात्र रिंकू मराठी सिनेमात काम कधी करणार याची रसिकांना प्रतीक्षा आहे. नुकतंच तिच्या एका मराठी सिनेमाची घोषणाही झाली. लाडक्या आर्चीबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक असतात. मात्र तुमच्या लाडक्या आर्चीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

VIDEO:आर्ची पडली रे.....
स राट झालं जी म्हणत आर्ची फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. सैराट सिनेमातील आर्ची रसिकांच्या काळजात घर करुन गेली आहे. तिचे बिनधास्त वागणं, परशावर जीवापाड प्रेम करणं, बुलेट आणि ट्रॅक्टर चालवणं, आपल्या प्रेमासाठी घरच्यांच्या विरोधाची पर्वा न करणं अशी आर्चीची विविध रुपे रसिकांना भावली. त्यामुळेच एका सैराट या सिनेमामुळे आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.या सिनेमातील या खास भूमिकेसाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. सैराट सिनेमानं तिकीट खिडकीवरील सगळेच रेकॉर्ड मोडीत काढले आणि मराठी सिनेमाला आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुच्या रुपात नवी अभिनेत्री गवसली. सैराट सिनेमाच्या यशानंतर आर्ची म्हणजेच रिंकू तिच्या अभ्यासात बिझी होती. तिनं दहावीची परीक्षा दिली. त्यात ती पासही झाली. मात्र या काळात एक कन्नड सिनेमा वगळता कोणताही सिनेमा केला नाही. मनसु मल्लिगे हा कन्नड सिनेमा रिंकूने केला. हा कन्नड सिनेमा म्हणजेच सैराटचा रिमेक होता. मात्र रिंकू मराठी सिनेमात काम कधी करणार याची रसिकांना प्रतीक्षा आहे. नुकतंच तिच्या एका मराठी सिनेमाची घोषणाही झाली. लाडक्या आर्चीबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक असतात. मात्र तुमच्या लाडक्या आर्चीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ शुटिंग दरम्यानचा आहे. या व्हिडीओत आर्ची म्हणजेच रिंकू पाहायला मिळेल. एका शॉट्साठी आर्ची सज्ज होत आहे. हा सीन बहुदा एखाद्या गाण्याचा असावा असं त्या व्हिडीओतील म्युझिकवरुन वाटेल. मात्र चित्रीकरणाला सुरुवात होताच जे घडलं ते पाहून सेटवर मोठा गोंधळ उडाला.दिग्दर्शकानं ऍक्शन म्हणताच आर्चीनं उडी मारली. मात्र जिथं शुटिंग सुरु होती तो भाग ओला असल्याने तिथं रिंकू पाय घसरुन जोरात आपटली. रिंकू खाली कोसळताच सेटवर एकच धावपळ उडाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सगळ्यांनी आपल्या हातात जे काही असेल ते फेकून रिंकूला उचलण्यासाठी तिच्याकडे धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कोणत्या सिनेमाचा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून आर्चीच्या फॅन्सच्या काळजाचा ठोका मात्र नक्कीच चुकेल!