ज्येष्ठ अभिनेते रमेश मेढेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 08:08 PM2019-05-30T20:08:55+5:302019-05-30T20:09:07+5:30

ज्येष्ठ अभिनेते रमेश मेढेकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

Veteran actor Ramesh Medhekar passes away | ज्येष्ठ अभिनेते रमेश मेढेकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते रमेश मेढेकर यांचे निधन

googlenewsNext


ज्येष्ठ अभिनेते रमेश मेढेकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

गेली जवळपास ५५ वर्षे ते रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या क्षेत्रात कार्यरत होते. थिएटर अकादमी, पुणे या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. गुरुवर्य भालबा केळकर यांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रामाटीक असोसिएशन पासून त्यांच्या रंगमंचीय कार्यकीर्दीला सुरुवात झाली. पीडीए मध्ये त्यांनी तू वेडा कुंभार, देवांचे मनोराज्य, देव चालले, अश्या नाटकांमधून विविध भूमिका केल्या. १९७३मध्ये थिएटर अकादमी, पुणेची स्थापना झाल्यावर त्यांची घाशीराम कोतवाल, महानिर्वाण, तीनपैशाचा तमाशा, बेगम बर्वे अशा नाटकातून केलेल्या भूमिका गाजल्या. जब्बार पटेल यांच्या सिंहासन, सामना या चित्रपटातून त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून भूमिका केल्या. गेली काही वर्षे त्यांनी इंडियन मॅजिक आय या संस्थेतून अनेक दूरदर्शन मालिकांमधून कामे केली. सध्या सोनी मराठीवर त्यांची ‘ती फुलराणी’ नावाची मालिका सुरू आहे.
 

Web Title: Veteran actor Ramesh Medhekar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.