दशक्रिया या चित्रपटातील एका अंभगाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 15:44 IST2017-11-11T10:14:43+5:302017-11-11T15:44:43+5:30

दादर येथील प्रसिद्ध रवींद्र नाट्यमंदिरातील पुलंच्या पुतळ्याजवळ, त्यांच्या चरणी संजय कृष्णाजी पाटील रचित आणि संगीतकार अमितराज यांनी संगीतबद्ध केलेले ...

The unveiling was done in a different way | दशक्रिया या चित्रपटातील एका अंभगाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले अनावरण

दशक्रिया या चित्रपटातील एका अंभगाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले अनावरण

दर येथील प्रसिद्ध रवींद्र नाट्यमंदिरातील पुलंच्या पुतळ्याजवळ, त्यांच्या चरणी संजय कृष्णाजी पाटील रचित आणि संगीतकार अमितराज यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या भक्तिमय सुरांनी सजलेल्या "जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ" हे 'ळ' चे यमक असलेल्या अभंगाचे अनावरण एका अनोख्या पद्धतीने करण्यात आले. ‘रंगनील क्रिएशन्स’च्या कल्पना विलास कोठारी निर्मित आणि युवा दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटात हा अभंग प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. हा अभंग प्रकाशित करण्यासाठी थेट पुलंच्या या जागेशिवाय इतर पवित्र जागा दुसरी नसल्याचे सांगत आम्ही 'दशक्रिया'च्या संहितेचेही पहिल्यांदा वाचन याच वास्तूत केले होते. त्यांचे व्यक्तित्व अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आले आहे, त्यांच्या आशीर्वादानेच ही निर्मिती माझ्याकडून झाली असावी आणि त्यामुळेच हा योग जुळून आला असावा अशी प्रतिक्रिया या चित्रपटाचे गीतकार, पटकथाकार, संवादकार आणि प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील यांनी दिली.
७२ मैल या चित्रपटातून उत्तमोत्तम गाणी दिल्यानंतर संगीतकार अमितराज आणि गीतकार संजय कृष्णाजी पाटील पुन्हा एकदा या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दशक्रिया या चित्रपटाची गाणी या दोघांनी मिळून केली आहेत. अभंग, लग्नगीत आणि लहान मुलांचं धमाल गाणं अशी वेगवेगळ्या प्रकारची तीन गाणी या चित्रपटात ऐकायला मिळणार आहेत.
या चित्रपटाने आजवर तीन राष्ट्रीय आणि अकरा राज्य पुरस्कारांसोबत विविध सन्मान मिळवले आहेत. साहित्यिक बाबा भांड यांच्या गाजलेल्या 'दशक्रिया' कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे. आर्या आढाव, मनोज जोशी, दिलीप प्रभावळकर, मिलिंद शिंदे, आदिती देशपांडे, उमा सरदेशमुख, संतोष मयेकर, नंदकिशोर चौघुले अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. उत्तम कथानकाला श्रवणीय संगीताचीही जोड मिळाली आहे. संजय पाटील यांनी आजवर अनेक उत्तमोत्तम गाणी लिहिली आहेत. 'दशक्रिया' या चित्रपटात ‘झिम्मा गं पोरी फुगडी’, ‘जगण्याचे देव लाभो ऐसे बळ’, ‘गुरुजीचं म्हातारं गजाकलं’ अशा तीन सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे.

Also Read : दिलीप प्रभावळकर आणि मनोज जोशी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या दशक्रिया या चित्रपटाच ट्रेलर लाँच

Web Title: The unveiling was done in a different way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.