‘काय झालं कळंना’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 12:00 PM2017-09-06T12:00:04+5:302017-09-06T17:30:04+5:30

प्रेम या एका शब्दातच संपूर्ण जग सामावून गेलेलं आहे. मराठी रुपेरी पडद्यावर आलेल्या अनेक प्रेमकथांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...

Unveiling the poster of 'What happened?' | ‘काय झालं कळंना’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

‘काय झालं कळंना’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

googlenewsNext
रेम या एका शब्दातच संपूर्ण जग सामावून गेलेलं आहे. मराठी रुपेरी पडद्यावर आलेल्या अनेक प्रेमकथांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेमकथेवर आधारित ‘काय झालं कळंना’ हा नवाकोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर अनावरण नुकतेच कलाकार तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत अंधेरीच्या राजाच्या चरणी  दिमाखात संपन्न झाले. यावेळी कलाकारांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

प्रेमाच्या पलीकडे जात एक ठोस विचार या चित्रपटातून मांडण्यात आला आहे जो प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास निर्माते पंकज गुप्ता यांनी याप्रसंगी व्यक्त केला. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन प्रा.लि प्रस्तुत व पंकज गुप्ता निर्मित ‘काय झालं कळंना’ आपल्या मातीतली प्रेमकथा असून प्रेमाद्वारे सामाजिक संदेश मांडणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत असून या दोघांसोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रीकांत कांबळे यांच्या भूमिका आहेत.

‘काय झालं कळंना’ चित्रपटाची कथा सुचिता शब्बीर यांची असून पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे यांचे आहेत. चित्रपटाची गीते माधुरी अशिरघडे, वलय मुलगुंद यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, उर्मिला धनगर, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे हे गायक यातील गीते स्वरबद्ध करणार आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. ‘काय झालं कळंना’ चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत.     

Web Title: Unveiling the poster of 'What happened?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.