ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांना अनोखी आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 12:35 IST2017-01-07T12:35:48+5:302017-01-07T12:35:48+5:30

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचा १३ जानेवारीला स्मृतीदिन आहे. यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अनोखी आदरांजली वाहण्यात येणार आहे. नाटककार अनंत ...

Unique honors to veteran artist Prabhakar Panashikar | ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांना अनोखी आदरांजली

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांना अनोखी आदरांजली

येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचा १३ जानेवारीला स्मृतीदिन आहे. यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अनोखी आदरांजली वाहण्यात येणार आहे. नाटककार अनंत पणशीकर यांनी ही अनोखी आदरांजली वाहण्याचे ठरविले आहे. १३ जानेवारीला त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त माझी आई तिचा बाप हे नाटक रंगभूमीवर सादर करण्यात येणार आहे. अनंत पणशीकर निर्मित हे नाटक आहे. अनाथ असलेले एक जोडपं त्यांच्या बाळासाठी आजी आजोबा शोधाण्याचे ठरवितात. ते कसे शोधतात, त्यातून होणारी गंमत जंमत यासर्व गोष्टी या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नाटकात स्मिता जयकर, मोहन जोशी, अजित केळकर, पूर्वी भावे आणि सचिन देशपांडे या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. तसेच हे नाटक फ्रान्सिस आॅगस्टीन यांनी लिहिले असून या नाटकाचे दिग्दर्शन सुदेश माशेलकर करणार आहे.  मात्र अनंत पणशीकर हे अडीच वर्षानंतर माझी आई तिचा बाप हे नवीन नाटक व्यावसायिक रंगभूमीवर घेऊन येत आहे. यापूर्वी त्यांनी अवघा रंग, लेकुरे उदंड झाली, लग्नाची बेडी यांसारख्या अनेक नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. असे हे नवकोरे नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वास्तव आयुष्यातील ही गोष्ट एका नाटकाच्या स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. थोडक्यात सध्याच्या काळातील परिस्थिती वास्तवात रंगभूमीवर सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांना नक्कीच पसंतीस उतरेल असे म्हणण्यास हरकत नाही. या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यत एक छान संदेश प्रेक्षकांपर्यत पोहोचणार आहे. चला तर प्रेक्षकांना आणखी काही दिवस या नाटकाची वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: Unique honors to veteran artist Prabhakar Panashikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.