युवागिरीच्या टीमचे अनोखे ख्रिसमस सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 14:02 IST2016-12-22T14:02:08+5:302016-12-22T14:02:08+5:30
ख्रिसमस म्हटले की सगळ्यांना वेध लागतात ते सांताक्लोझचे. सांता आपल्याला येऊन गिफ्ट कधी देणार याची सगळ्यात जास्त उत्सुक लहान ...

युवागिरीच्या टीमचे अनोखे ख्रिसमस सेलिब्रेशन
ख रिसमस म्हटले की सगळ्यांना वेध लागतात ते सांताक्लोझचे. सांता आपल्याला येऊन गिफ्ट कधी देणार याची सगळ्यात जास्त उत्सुक लहान मुलांमध्ये असते. नेमक हेच लक्षात घेऊन युवागिरीच्या टीमने लहान मुलांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट केले आहे. झी युवा या वाहिनीचा अत्यंत वैविध्यपूर्ण गोष्टीनी नटलेला असा "युवागिरी" हा शो सध्या वेगळ्या प्रकारे आपला ख्रिसमस सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीने आपले सामाजिक भान जपणे आवश्यक असते आणि हीच सामाजिकी जाणीव लक्षात घेत युवागिरीच्या अपुर्व रांजणेकर आणि स्नेहा चव्हाण यांनी अनाथ मुलांसबोत ख्रिसमस स्पेशल शो सेलिब्रेट केला यावेळी युवागिरीची संपूर्ण टीम ही उपस्थित होती. दरम्यान मुलांसोबत बरीच धमाल मस्ती शूट करण्यात आली. त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी युवागिरी ने झी युवावर आपल्या प्रेक्षकांना आवाहन केल्यानंतर मुंबईतील संत गाडगेबाबा महाविद्यालय आणि पुण्यातील के बी जोशी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी काही भेटवस्तू "सलाम बालक" या संस्थेतील मुलांना डोनेट केल्या होत्या. त्या भेटवस्तू ख्रिस्तमसचे औचित्य साधत युवागिरीच्या टीमने त्या मुलांपर्यंत पोहोचवल्या. जितकी धमाल मस्ती युवागिरी ने के बी जोशी कॉलेज आणि संत गाडगे बाबा कॉलेज मध्ये केली तितकिच किंवा त्यापेक्षा जास्त धमाल मस्ती “सलाम बालक” या संस्थेतील मुलांसोबत केली. गप्पा -गोष्टी, नाच- गाणी यामध्ये गुंग होऊन ही अनाथ मुलं युवागिरिचा एक भाग झाली. नाथ मुलांचे एक वेगळं असं जग असते. त्या जगात आपण कधीच गेलेले नसतो. पण युवागिरी ने त्या जगात जाऊन एक मोलाची कामगिरी बजावली. क्षणिक का होईना पण आनंदाची हलकिशी झालर प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर पसरवली. युवागिरीने उचलेले पाउल खरच कौतुकास्पद आहे.