व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट सिनेमातील कलाकारांची आगळीवेगळी भाऊबीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 04:00 PM2018-11-03T16:00:28+5:302018-11-03T16:02:05+5:30

‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटाची नायिका जानकी पाठक दरवर्षी प्रमाणे यंदा ही तिचा लाडका कुत्रा कॅस्पर याच्यासोबत तिची भाऊबीज साजरी करणार आहे.

Unique brother-in-law of the artists of Vanilla, Strawberries and Chocolate Cinema | व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट सिनेमातील कलाकारांची आगळीवेगळी भाऊबीज

व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट सिनेमातील कलाकारांची आगळीवेगळी भाऊबीज

googlenewsNext

‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असंच भाऊ बहिणीच नातं असतं. या नात्याची हीच खासियत आहे. भाऊ बहिणीच नातं साजरं करणारा भाऊबीज हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या नात्यातला गोडवा ही भाऊबीज द्विगुणीत करते. नात्यांचा हा उत्सव साजरा करण्यासाठी आता सगळेच भाऊ बहिण उत्सुक असतील.  

अशाच एका बहिणीने आपल्या भावाचं कौतुक करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पण तिची ही भाऊबीज मात्र आगळी वेगळी आहे. ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटाची नायिका जानकी पाठक दरवर्षी प्रमाणे यंदा ही तिचा लाडका कुत्रा कॅस्पर याच्यासोबत तिची भाऊबीज साजरी करणार आहे. एक भाऊ बहिणीसाठी जे काही करतो ते सगळचं कॅस्पर जानकीसाठी करतो. कोणत्याही प्रसंगात तो तिच्यासोबत असतो. आणि म्हणूनच जानकी दरवर्षी कॅस्पर सोबत आपली भाऊबीज साजरी करते. ही भाऊबीज साजरी करताना ती कॅस्परला ओवाळणार आहे, त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालणार आहे, इतकंच नाही तर तिने त्याच्यासाठी एक छानस गिफ्ट सुद्धा आणलं आहे.

तिचं हेच प्राणीप्रेम आपल्याला लवकरच ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ चित्रपटातूनही पहायला मिळणर आहे. ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ हा सिनेमा १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती गिरीश विश्वनाथ यांची आहे. कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व दिग्दर्शन अशी सगळी जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. नवोदित अभिनेत्री जानकी पाठक हिच्यासोबत रवी काळे,  राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते डॉ. सुनील निचलानी आहेत.

 

Web Title: Unique brother-in-law of the artists of Vanilla, Strawberries and Chocolate Cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.