​अमेय वाघला का झालीये बेकार एक्साईटमेन्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 13:56 IST2017-01-25T08:26:15+5:302017-01-25T13:56:15+5:30

अभिनेता अमेय वाघने मालिका, चित्रपट आणि रंगभूमीवरील त्याच्या दर्जेदार अभिनयाने आजवर प्रेक्षकांची वाहवा मिळवलीच आहे. सध्या अमेय काही चित्रपट, ...

Unexpected Execution of Ameya Waghala | ​अमेय वाघला का झालीये बेकार एक्साईटमेन्ट

​अमेय वाघला का झालीये बेकार एक्साईटमेन्ट

िनेता अमेय वाघने मालिका, चित्रपट आणि रंगभूमीवरील त्याच्या दर्जेदार अभिनयाने आजवर प्रेक्षकांची वाहवा मिळवलीच आहे. सध्या अमेय काही चित्रपट, त्याचे एक नाटक आणि टिव्ही शोच्या सुत्रसंचालनामध्ये पुरता व्यस्त आहे. पण असे असतानाही हा पठ्ठ्या सोशल साईट्सवर मात्र त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच काही ना काही अपडेट्स देतच असतो. आता हेच पाहा ना, नुकतेच अमेयने या वर्षातील त्याच्या दोन चित्रपटांबद्दल नेटिझन्सना सांगितले आहे. अमेयचे या वर्षी दोन अतिसय महत्वाकांक्षी चित्रपट येत आहेत. यामधील एक चित्रपट तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आणि तो म्हणजे फास्टर फेणे. मग अमेयचा दुसरा चित्रपट कोणता हा प्रश्न तुम्हाला पण नक्कीच पडला असणार ना? आता या दुसºया चित्रपटाचा खुलासा देखील अमेय लवकरच करणार आहे. परंतू त्याने केलेल्या एका टविटमध्ये त्याची या चित्रपटांसाठी असलेली उत्सुकता लगेचच दिसून येत आहे. माझे या वर्षी दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एक रोमँटिक आणि दुसरा असेल डिटेक्टीव्ह सिनेमा. दोन वेगळ््या प्रकारचे चित्रपट पण एक समान गोष्ट ती म्हणजे बेकार एक्साईटमेन्ट... असे टविट अमेयने केले आहे. त्यामुळे अमेयच्या चाहत्यांसाठी यावर्षी त्याच्या चित्रपटांचा डबल धमाका असणार आहे. 

Web Title: Unexpected Execution of Ameya Waghala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.