"घराचा cafe केलाय बाईंनी", बायकोबद्दल असं का बोलला उमेश कामत? Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 01:16 PM2023-04-26T13:16:58+5:302023-04-26T13:28:05+5:30

बायकोला सतत कॉफी देणाऱ्या नवऱ्याची व्यथाच त्याने व्हिडिओतून मांडली आहे.

umesh kamat shared video ofnhim making coffee for wife priya bapat with an interesting caption | "घराचा cafe केलाय बाईंनी", बायकोबद्दल असं का बोलला उमेश कामत? Video व्हायरल

"घराचा cafe केलाय बाईंनी", बायकोबद्दल असं का बोलला उमेश कामत? Video व्हायरल

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जोडी. त्यांची लव्हस्टोरी तर खूपच इंटरेस्टिंग आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दोघंही उत्तम संसार करत आहेत. आपली प्रोफेशनल लाईफ सांभाळत एकमेकांना वेळही देत आहेत. मात्र नुकतीच उमेशने बायकोविरोधात सोशल मीडियावर जाहीर तक्रार केली आहे. 'घराचा कॅफे केलाय या बाईने'' असं त्याने म्हटलं आहे. नेमकं काय झालं या दोघांमध्ये जाणून घेऊया.

अभिनेत्री प्रिया बापटला कॉफी प्रचंड आवडते हे तिने अनेकदा मुलाखतीत तसंच सोशल मीडियावर सांगितलं आहे. बायकोची आवडती कॉफी बनवण्याचं काम नवरा उमेश उत्तमप्रकारे करतोय. उमेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो कॉफी बनवतो आणि प्रियाला आवाज देत म्हणतो प्रिया...कॉफी तयार आहे. मात्र प्रिया काहीच उत्तर देत नाही, यानंतर तो पुन्हा एकदा ओरडतो तरी ती काहीच उत्तर देत नाही. मग उमेश शक्कल लढवतो. तो कॅफे स्टाईलमध्ये आवाज देत म्हणतो, कॅपेचिनो(Cappucino) फॉर प्रिया...हे ऐकताच प्रिया म्हणते.. आले...'

उमेशने व्हिडिओला भन्नाट कॅप्शनही दिलं आहे. 'घराचा कॅफे केलाय बाईंनी, माझ्या बायकोला आवडते माझ्या हातची कॉफी..हीच मला मिळालेली खरी ट्रॉफी'. सारखं कॅफेमध्ये जाण्याची सवय असलेल्या बायकोला घरी कॉफी देणाऱ्या नवऱ्याची व्यथा त्याने मांडली आहे.

या व्हिडिओ सिनेसृष्टीतील इतर कलाकारांनाही हसू आवरलं नाही. अनेक जण कमेंट्समध्ये व्हिडिओवर हसत आहेत. प्रिया आणि उमेश यांची 'आणि काय हवं' ही सिरीज एमएक्स प्लेयरवर आली होती. नवरा बायकोमधील हलकी फुलकी कॉमेडी या सिरीजमध्ये दाखवण्यात आली होती. या सिरीजचा पुढचा भाग कधी येणार म्हणत चाहते सतत त्यांना प्रश्न विचारत आहेत.

Web Title: umesh kamat shared video ofnhim making coffee for wife priya bapat with an interesting caption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.