कौटुंबिक अस्वास्थ्य चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न - निर्माते-दिग्दर्शक भानुदास व्यवहारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 13:13 IST2018-03-26T07:43:30+5:302018-03-26T13:13:30+5:30

चंदेरी दुनियेचे आकर्षण प्रत्येकालाच असते. या आकर्षणातूनच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकत स्वत:ला सिद्ध करून दाखवणारी अनेक उदाहरण आपण आजवर पाहिली आहेत. ...

Trying to show a family unhealthy movie - Producer-director Bhanudas Vyavahar | कौटुंबिक अस्वास्थ्य चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न - निर्माते-दिग्दर्शक भानुदास व्यवहारे

कौटुंबिक अस्वास्थ्य चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न - निर्माते-दिग्दर्शक भानुदास व्यवहारे

देरी दुनियेचे आकर्षण प्रत्येकालाच असते. या आकर्षणातूनच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकत स्वत:ला सिद्ध करून दाखवणारी अनेक उदाहरण आपण आजवर पाहिली आहेत. चित्रपटसृष्टीत कोणताही गॉडफादर नसताना सोलापूरच्या भानुदास व्यवहारे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर दत्तात्रेय मोहिते यांच्या साथीने चित्रपटनिर्मितीचे स्वप्न पूर्ण केले. भानुदास व्यवहारे यांना चित्रपटाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. या आवडीतूनच त्यांनी ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीची व दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. चांगल्या कामासाठी मदतीचे अनेक हात पुढे येत
असतात. भानुदास यांची कलाकृती साकार व्हावी यासाठी अभय भंडारी, प्रमोद वेदपाठक, सुभाष चव्हाण, औदुंबर व्यवहारे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. आपल्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासाबद्दल बोलताना भानुदास सांगतात की, या क्षेत्रात काम करायचे असेल तर कष्ट करायची तयारी पाहिजे. चित्रपटाच्या निर्मिताचा प्रवास सोपा नव्हता, इतरांना येतात तशा अनंत अडचणी आल्या. पण
त्यावर मात करत मी चित्रपट पूर्ण केला. बदलत्या जीवनशैलीने कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर सर्वत्र मोठ्या प्रमाणात तणाव वाढत चालल्याचं दिसतंय. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत ही अवस्था वरचेवर निर्माण होते आणि या सर्वांमधून निर्माण झालेलं कौटुंबिक अस्वास्थ्य चित्रपटाच्या माध्यमातून दाखवत प्रबोधन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी चित्रपटातून केला असल्याचे ते नमूद करतात. वैवाहिक आयुष्यातील समस्या, मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन यासोबत समाजाची मानसिकता या सगळ्यांवर चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. विक्रम गोखले, यतिन कार्येकर, सुरेश विश्वकर्मा, सुनील गोडबोले, भक्ती चव्हाण, श्वेता खरात, सुवर्णा काळे, रितेश नगराले, राहूल पाटील, हर्षा शर्मा, अर्जुन जाधव, शंकर सूर्यवंशी हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते अभय भंडारी, प्रमोद वेदपाठक, सुभाष चव्हाण, औदुंबर व्यवहारे असून सहदिग्दर्शन निशांत आडगळे यांनी केले आहे. कथा,पटकथा,संवाद भानुदास व्यवहारे यांचे आहेत. छायांकन सिद्धेश मोरे यांनी तर संकलन माधव शिरसाट यांचे आहे. ध्वनीमुद्रण कीर्ती पांचाळ यांचे असून ध्वनीआरेखन प्रमोद चांदोरकर यांनी केले आहे. रंगभूषा- वेशभूषा कुमार मगरे यांची आहे. 
‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ ३० मार्च ला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Trying to show a family unhealthy movie - Producer-director Bhanudas Vyavahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.