अशी जमली सचिन पिळगांवकर-सुप्रिया पिळगांवकरची जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:40 IST2016-12-21T12:17:27+5:302016-12-21T16:40:44+5:30
सचिन सुप्रिया मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन कपल आहेत. आजही मराठी चित्रपटसृष्टीत या दोघांच्या जोडीकडे आदराने पाहीले जाते. अनेक मराठी चित्रपटांमध्ये ...

अशी जमली सचिन पिळगांवकर-सुप्रिया पिळगांवकरची जोडी
सचिन सुप्रिया मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन कपल आहेत. आजही मराठी चित्रपटसृष्टीत या दोघांच्या जोडीकडे आदराने पाहीले जाते. अनेक मराठी चित्रपटांमध्ये या दोघांनीही एकत्र काम केले आहे. ऐशी-नव्वदचा काळ या जोडप्याने आपल्या अफलातून चित्रपट आणि केमिस्ट्रीने चांगलाच गाजवला होता. अनेक सुपरहिट चित्रपट आपल्या नावावर केलेली ही जोडी नच बलिये सारखा डान्सिंग रिअॅलिटी शो देखील जिंकली आहे. आज सचिन-सुप्रियाच्या लग्नाचा ३१ वा वाढदिवस ते साजरा करीत आहेत. या कपलच्या काही खास गोष्टी तुम्हीही आमच्या सोबत जाणून घ्या...
कसे भेटले सचिन-सुप्रिया : नवरी मिळे नवºयाला या चित्रपटाच्या सेटवर या दोघांचीही पहिली भेट झाली. सचिन या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. तसेच तो यामध्ये अभिनय देखील करीत होता. तर सुप्रिया देखील चित्रपटाचा भाग होती. सुप्रियाला सचिनमध्ये तिचा नवरा दिसू लागला. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांचीही पे्रमकहाणी फुलली. परंतू या दोघआंनीगी आपले नाते काही काळ लपवून ठेवले. एक अभिनेत्री दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली अशा चर्चा त्यांना होऊ द्यायच्या नव्हत्या.
![]()
सचिनने सुप्रियाला प्रपोज केल्यावर ती काय म्हणाली : सचिनने नवरी मिळे नवºयाला या चित्रपटाच्या सेटवर सुप्रियाला पाहीले होते. पाहत्याक्षणी तो तिच्या प्रमात पडला होता. परंतू तीला हे कसे सांगायचे हा प्रश्न त्याचा समोर उभा होता. काही केल्या सुप्रियाशी बोलायचे सचिनचे धाडस होईना. परंतू एक दिवशी हिंमत करुन तो सुप्रियाकडे गेला आणि त्याने तिला लग्नाबद्दल विचारलेच. यावर सुप्रियाला त्याला म्हणाली, अहो मला वाटले तुमचे लग्न झाले असेल. पण सचिनला आधी वाटले ही गंमंत करतेय. पण सुप्रिया अतिशय गंभीरपणे हे बोलत होती. त्यावेळी सचिनने तिला सांगितले नाही मी सिंगलच आहे.
![]()
सुप्रिया आई-वडिलांना घाबरली, का नाही सांगितले नात्याविषयी : सुप्रियाने सुरुवातीला हे नाते घरी सांगितले नव्हते. सचिन हा मराठी चित्रपटसृष्टीत तेव्हा चांगलाच नावाजलेला होता. परंतू सुप्रिया अवघ्या सोळा वर्षांची होती. सचिन-सुप्रियामध्ये तब्बल ११ वर्षांचे अंतर होते. घरच्यांना ही गोष्ट समजली तर ते कसे रिअॅक्ट होतील याची सुप्रियाला भीती होती.
![]()
अशाप्रकारे सुप्रियाच्या घरी समजलेच : सुप्रियाने बारावीची बोर्ड प्रिलीअम परिक्षा दिली नव्हती. कॉलेजकडुन सुप्रियाच्या घरी परिक्षा दिली नसल्याचे लेटर गेले. त्यानंतर सुप्रियाच्या पालकांनी ही परिसिथिती शांतपणे हाताळली. काही दिसांनंतर ते सचिनच्या आई-वडिलांना भेटले आणि अवघ्या सहा महिन्यांनंतरच सचिन सुप्रियाचे २१ डिसेंबर १९८५ रोजी लग्न झाले.
![]()
वयातील अंतर कितीही असले तरी मन जुळायला हवे : सचिन सांगतो, आमच्या दोघांच्या वयातील अंतर किती आहे याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. आमची मने अगदीच जुळतात. आम्ही दोघेही अगदी सारखे आहोत. आणि जर कपल मध्ये भांडणे झाली नाहीत तर ते कपल कसले. सगळकाही छान छान चालु असलं तरी लाईफ एकदमच बोरिंग वाटू लागते. त्यामुळे नात्यात नाक-झोक पाहीजेज.