‘इपितर’च्या माध्यमातून शास्त्रज्ञांना दिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 15:27 IST2018-05-11T09:57:45+5:302018-05-11T15:27:45+5:30
आइझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्सटाइन, आणि थॉमस एल्वा एडिसन हे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले. ह्या शास्त्रज्ञांना आपल्या नव्या पोस्टर व्दारे ...

‘इपितर’च्या माध्यमातून शास्त्रज्ञांना दिली श्रद्धांजली
आ झॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्सटाइन, आणि थॉमस एल्वा एडिसन हे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले. ह्या शास्त्रज्ञांना आपल्या नव्या पोस्टर व्दारे 'इपितर' सिनेमाच्या निर्मात्यांनी ट्रिब्यूट दिलेला आहे.
पोस्टरविषयी सांगताना दिग्दर्शक दत्ता तारडे म्हणतात, "आपण वेडेपिर असल्याशिवाय नवे शोध लागत नाहीत, हे ह्या शास्त्रज्ञांनी सिध्द केलं आहे. तसेच इपितर सिनेमातले हे तीन नायक आहेत. ह्या तीन नायकांचं 'वेड' आणि त्यांचा इरसालपणाचं संपूर्ण सिनेमा घडवतो."
लेखक-निर्माते किरण बेरड सांगतात, "आमच्या सिनेमाची टँगलाइनच आहे, 'लईच येडे भो'... ह्या थोर शास्त्रज्ञांसारखेच ह्या तीन नायकांमध्ये असलेली ध्येयाने झपाटण्याची वृत्ती एकिकडे तुम्हांला सामाजिक संदेश देईल. तर त्यांच्या ह्या वृत्तीमूळे जी विनोदनिर्मिती सिनेमात होते. त्यामूळे तुमचे मनोरंजन होईल."
डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत इपितर सिनेमाची निर्मिती नितिन कल्हापूरे आणि किरण बेरड ह्यांनी केली आहे. दत्ता तारडे दिग्दर्शित ह्या विनोदी सिनेमात भारत गणेशपुरे ,मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे ,जयेश चव्हाण ,विजय गीते ,गणेश खाडे ,निकिता सुखदेव, वृंदा बाळ ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. इपितर चित्रपट 8 जून 2018 ला रिलीज होणार आहे.
छोट्या छोट्या गावांमध्ये राहत असली तरी तेथे राहणा-या मुलांची स्वप्नं मोठी असतात.जीवनात काही तरी करुन दाखवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असते. हीच स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. अंगी कला असली, की मग ती कला व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही. जातिवंत कलाकार कोणत्याही साधनेतून कला सिद्ध करून दाखवतोच मग त्याला कितीही अडचणी असल्या तरीसुध्दा ती कला उभी करतोच. असच एक उदाहरण ठरलंय सिनेमाचा दिग्दर्शक किरण बेरड. किरणचेही सिनेमा बनवण्याचे स्वप्न होते. 'इपीतर' नावाच्या या सिनेमाचं चित्रीकरण अहमदनगर जिल्ह्यात करण्यात असून केवळ ३६ दिवसांमध्ये ते पूर्ण झाले आहे. अखेर किरणचं स्वप्न या सिनेमाच्या निमित्ताने पूर्णत्वास येत आहे. डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत, नितिन कोल्हापूरे आणि किरण बेरड निर्मित आणि दत्ता तारडे दिग्दर्शित इपितर 8 जून 2018 ला रिलीज होणार आहे.