​एका नव्या चित्रपटामधून निळू फुलेंना श्रद्धांजली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 13:29 IST2016-05-31T07:59:58+5:302016-05-31T13:29:58+5:30

‘बाई, वाड्यावर या!’ या डायलॉगने जगप्रसिदध झालेले निळू फुले यांना एका नव्या चित्रपटामधून श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या ...

Tribute to blue flowers from a new movie! | ​एका नव्या चित्रपटामधून निळू फुलेंना श्रद्धांजली!

​एका नव्या चित्रपटामधून निळू फुलेंना श्रद्धांजली!

ाई, वाड्यावर या!’ या डायलॉगने जगप्रसिदध झालेले निळू फुले यांना एका नव्या चित्रपटामधून श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटातील ‘थलायवा’ गाण्याच्या माध्यमातून शाहरुख आणि रोहित शेट्टीने रजनीकांतबाबत आदर व्यक्त केला होता. तशाच पद्धतीने ‘जलसा’ या नव्या चित्रपटामधून निळू फु लेंना आदराने श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. 

फुले यांनी लोकनाट्यापासून अभिनय क्षेत्रात आपल्या कार्याला सुरूवात केली होती. आणि चित्रपटातील दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.  खरं तर त्यांनी व्हिलनच्याच भूमिका जास्त केल्या तरीही त्यांचा स्त्री-चाहता वर्ग खूप मोठा होता. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांना खूप आदराने वागवले जायचे. अशा रांगड्या व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा देणार आहेत स्टुडियो ९ एंटरटेनमेंट आपल्या ‘जलसा’ या चित्रपटात.

या चित्रपटात ‘बाई, वाड्यावर या!’ हे शीर्षक वापरून एक धमाल गाणे तयार करण्यात आले आहे. आशुतोष राज यांच्या लेखणीतून उतरल्या या गाण्यावर नृत्य साकारणार आहे मानसी नाईक, ज्यावर स्वरसाज चढविला आहे संगीतकार समीर साप्तीस्कर यांनी. आणि आनंद शिंदे यांंच्या भारदस्त आवाजाने हे गाणे गायले जाणार आहे. 

Web Title: Tribute to blue flowers from a new movie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.