कोणासोबत श्रिया करतेय ट्रॅव्हलिंग ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 15:45 IST2016-11-08T15:44:29+5:302016-11-08T15:45:38+5:30

प्रत्येक व्यक्तीला फिरायला खूप आवडते. या प्रवासात जर आपल्यासोबत आपले मित्र-मैत्रिणीनी असतील तर मग कल्लाच होतो. त्याचप्रमाणे एखादया प्रवासामध्ये ...

Traveling with whom? | कोणासोबत श्रिया करतेय ट्रॅव्हलिंग ?

कोणासोबत श्रिया करतेय ट्रॅव्हलिंग ?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">प्रत्येक व्यक्तीला फिरायला खूप आवडते. या प्रवासात जर आपल्यासोबत आपले मित्र-मैत्रिणीनी असतील तर मग कल्लाच होतो. त्याचप्रमाणे एखादया प्रवासामध्ये जर आपली आवडती व्यक्ती आपल्यासोबत प्रवास करत असेल. तर त्या प्रवासाला चार चाँद लागलेले असतात. तो प्रवास ती व्यक्ती कधीच विसरू शकत नसते. असाच एक प्रवास अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या बाबतीत घडवून आला आहे. श्रियाने नुकताच सोशल मीडियावर तिच्या आजोबांसोबतचा एक फोटो अपलोड केला आहे. तिचा हा फोटो परदेशातील दिसत आहे. तिने या फोटोसोबत एक स्टेटसदेखील अपडेट केले आहे. ''आजोबांसोबतची माझी ही ट्रीप खूपच छान झाली आहे. ते नेहमीच माझे आदर्श राहिले आहेत. तसेच ते माझे फेव्हरेट ट्रॅव्हल बडीदेखील आहेत.'' त्यामुळे माझ्यासाठी हा प्रवास खूपच अविस्मरणीय असणार आहे. तिच्या या स्टेटसमधून तिचे आजोबांवर असलेले प्रेम व्यक्तदेखील होत आहे. तिच्या या फोटोला आणि स्टेटसला सोशल मीडियावर भरभरून लाइक्स आणि कमेंन्ट मिळत आहेत. श्रिया मध्यंतरी बॉलिवूडचा किंग खानसोबत फॅन या चित्रपटात झळकली होती. त्यामुळे श्रेयाचे सर्वांनीच भरभरून कौतुकदेखील केले होते. खुद्द शाहरूख खाननेदेखील तिच्या अभिनयाचे कौतुक केले होते. श्रिया ही एकुलती एक या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. तसेच ती आपल्या अभिनयाने रंगभूमीदेखील गाजवताना दिसत आहे. अशी ही सचिन आणि सुप्रिया पिळगांवकरची कन्या श्रिया ही प्रेक्षकांचीदेखील फेव्हरेट झाली आहे. 

Web Title: Traveling with whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.