वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भेटली तू पुन्हा’ चा ट्रेलर प्रदर्शित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 10:16 IST2017-07-04T04:46:11+5:302017-07-04T10:16:11+5:30

एखादी व्यक्ती आवडली तर पहिल्याच नजरेत आवडते असं म्हणतात. पहिल्याच भेटीत तिच्याशी जन्मोजन्मीचे नाते निर्माण होते. या पहिल्याच नजरेत ...

The trailer of 'Bhailee Tu reh' is displayed in the lead role of Vaibhav Talist and Pooja Sawant! | वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भेटली तू पुन्हा’ चा ट्रेलर प्रदर्शित!

वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भेटली तू पुन्हा’ चा ट्रेलर प्रदर्शित!

ादी व्यक्ती आवडली तर पहिल्याच नजरेत आवडते असं म्हणतात. पहिल्याच भेटीत तिच्याशी जन्मोजन्मीचे नाते निर्माण होते. या पहिल्याच नजरेत घडणाऱ्या प्रेमाबद्दल खूप काही लिहिले, बोलले गेले आहे. प्रेम जरी आयुष्यात एकदाच होत असले तरी एकाच व्यक्तीच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडण्याची जादू काही औरच असते आणि म्हणूनच स्वरूप रीक्रिएशन अँड मीडिया प्रा. लिमिटेड प्रस्तुत, गणेश हजारे निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट खास आहे. कारण मुंबई येथे अनावरीत करण्यात आलेल्या ‘भेटली तू पुन्हा’ च्या ट्रेलरद्वारे दुसऱ्या नजरेत घडणाऱ्या प्रेमाची नशा अनुभवायला मिळत आहे.
प्रेमात पडण्यासाठी तुमचे सूर जुळायला लागतात. मग प्रेमकथा तरी नादमधुर गाण्यांशिवाय पूर्ण कशी होईल! ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणेच संगीतदेखील तितकेच श्रवणीय आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी असून जी शब्दबद्ध केली आहेत मंगेश कांगणे आणि संजय जमखंडी यांनी आणि संगीतबद्ध केली आहेत चिनार–महेशच्या जोडीने. या व्यतिरिक्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘जानू जानू’ या खास गाण्याची देखील निर्मित करण्यात आले आहे आणि चित्रपटाचे ‘भेटली तू पुन्हा’ हे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे विवेक देऊळकर यांनी. या सर्व गीतांना स्वप्निल बांदोडकर, आनंदी जोशी, निखिल मोदगी आणि सिद्धार्थ महादेवन यांचा आवाज लाभला आहे.  
वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत अशी फ्रेश जोडी असणारा हा चित्रपट मुंबई ते गोवा या प्रवासादरम्यान फुलणाऱ्या प्रेमकथेवर आधारित आहे. अतिशय फ्रेश दिसणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण प्रदीप खानविलकर यांनी केले असून संकलन सतीश पाटील यांचे आहे तर पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी यांच्या लुकचे श्रेय संतोष गावडे यांना जाते. प्रेम या संकल्पनेला पुन्हा नव्याने भेटवणारा हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: The trailer of 'Bhailee Tu reh' is displayed in the lead role of Vaibhav Talist and Pooja Sawant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.