आज मैं ऊपर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2016 05:58 AM2016-07-18T05:58:05+5:302016-07-18T11:28:05+5:30

सध्या मराठीतल्या अभिनेत्रींना दाक्षिणात्य सिनेमा खुणावतोय. अनेक अभिनेत्रींनी दाक्षिणात्य सिनेमात काम केलंय.आता याच अभिनेत्रींच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव ...

Today i am up ... | आज मैं ऊपर...

आज मैं ऊपर...

googlenewsNext
ong>सध्या मराठीतल्या अभिनेत्रींना दाक्षिणात्य सिनेमा खुणावतोय. अनेक अभिनेत्रींनी दाक्षिणात्य सिनेमात काम केलंय.आता याच अभिनेत्रींच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय. मराठमोळी अभिनेत्री नम्रता गायकवाड आता दाक्षिणात्य सिनेमात काम करणार आहे. नम्रतानं एक मल्याळम सिनेमा साईन केलाय..

या सिनेमातील भूमिकेसाठी लूक टेस्ट झाली असून लवकर शुटिंगलाही सुरुवात होणार आहे.. मात्र त्याचं नाव आताच सांगू शकत नसल्याचं नम्रतानं सांगितलं आहे. मात्र यावेळी नम्रतानं आपली या सिनेमातील भूमिकेची माहिती दिली. या सिनेमात एका बिझनेसवुमनची भूमिका साकारत असून दाक्षिणात्य सुपरस्टार विजयबाबू यांच्यासह काम करत असल्याचा आनंद नम्रतानं व्यक्त केलाय.. विजयबाबू यांच्यासारख्या सुपरस्टारसह काम करण्याची संधी मिळत असल्यानं प्रचंड एक्साईटेड असून तितकंच दडपण आल्याची कबूलीही नम्रतानं दिलीय.. याशिवाय नवी भाषा, नवे लोक, नवीन लोकेशन्स या सगळ्या गोष्टींचंही दडपण आल्याचं तिनं म्हटलंय..
 
या दाक्षिणात्य सिनेमासह मराठीतही नम्रताची घौडदौड सुरु आहे. लवकरच तिचा 'झरी' आणि 'शुभस्यशीघ्रम' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. शुभस्यशीघ्रम हा सिनेमा दाक्षिणात्या सिनेमाचा मराठी रिमेक आहे. अशा सिनेमाचा एक भाग असल्याचा अभिमान नम्रतानं व्यक्त केलाय. या सिनेमात नम्रता सौम्या नावाच्या एका कॉलेज विद्यार्थिनीची भूमिका साकारतेय. आजची तरुणाई सोशल नेटवर्किंग साईट्सच्या आहारी गेलीय. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल नेटवर्किंग साईट्सवर तरुणाई आपला जास्तीत जास्त वेळ घालवते. हाच विषय नम्रताच्या शुभस्यशीघ्रम या सिनेमाचा आहे. या सिनेमातील नायिका सौम्या सोशल नेटवर्किंग साईट्सला एडिक्ट असते. मात्र त्यातूनच कळत नकळत एका संकटात ती कशी सापडते.. ती घटना तिचं आयुष्य बदलून टाकते असं या सिनेमाचं कथानक असल्याचं नम्रतानं सांगितलंय.. या सिनेमाच्या निमित्ताने केरळची उत्तम लोकेशन्स रसिकांना मराठीत पाहायला मिळणार आहेत. तसंच यातील गाणीही तितकीच श्रवणीय असल्याचं सांगताना रोमँटिक गाण्याची ट्रीटही रसिकांना मिळणार आहे.
 
नम्रताचा 'झरी' नावाचा मराठी सिनेमाही लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.. यांत एका मागासलेल्या समाजातील झरी नावाच्या मुलीची भूमिका ती साकारतेय. या सिनेमाचं अकोल्यात शुटिंग करण्यात आलंय. या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी घडलेला गंमतीदार किस्साही नम्रतानं शेअर केलाय. “गुंड माझ्या मागे लागले आहेत असा सीन चित्रीत केला जात होता.. पायात काही नव्हतं.गुंड मागे आणि असिस्टंट डायरेक्टर पुढे पुढे असं सगळं सुरु होतं.. त्याचवेळी पुढे असलेल्या असि.डायरेक्टरच्या चेह-यावरचे हावभाव पूर्णपणे बदलून गेले.. तो माझ्याकडे बघून हातवारे करु लागला. थोडा वेळ काहीच कळत नव्हतं.. मात्र नंतर त्यानं सांगितलं की इथे साप आहे. हे ऐकून आमच्या सगळ्यांची घाबरगुंडीच उडाली होती.. हा किस्सा खरंच खूप भीतीदायक असा होता. नंतर मात्र त्यावर तितकंच हसूही येत होतं” असं नम्रतानं सांगितलं.
 
रुढी परंपरा झुगारुन स्वतंत्र विचारांची तरुणी असलेली भूमिका नम्रताला आगामी काळात साकारण्याची इच्छा आहे. 'क्वीन' सिनेमात कंगणा राणौतनं साकारलेल्या भूमिकेचं तिनं यावेळी उदाहरण दिलं.कंगणाची भूमिका प्रेरणादायी असल्याचंही तिनं सांगितलं.“एखादी मुलगी तिच्यावर संकट आलं तर काय करु शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे क्वीनमधील कंगणाची भूमिका त्यामुळं संधी मिळाल्यास तशी भूमिका साकारण्याची इच्छा आहे”. याशिवाय भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आर्यन लेडी इंदिरा गांधी यांच्या जीवनावर बायोपिक बनल्यास त्यातील इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यास आवडेल असंही तिने आवर्जून सांगितलंय. इंदिरा गांधी यांच्या व्यक्तीमत्त्वाची आधीपासून भुरळ असल्याचं तिनं म्हटलंय..
 
शुटिंग नसताना फावला वेळसुद्धा नम्रता सत्कार्मी लावतेय. सध्या ती गिटार शिकतेय. गिटार शिकणं अवघड असल्याचं तिला वाटतं.. त्यासाठी हाताच्या बोटाची नखं कापलीत.. गिटार वाजवताना बोटाला इजा होऊन रक्तही येतं. मात्र ही एक प्रकारची तपश्चर्याच असल्याचं वाटतं असं ती सांगते.. रिकाम्या वेळात सोसायटीमधल्या डान्स क्लबमध्ये जाऊन डान्स करते.डान्स एक प्रकारे व्यायाम असून त्यामुळं मिळणारं समाधानही तिला मोलाचं वाटतं.नवीन मराठी सिनेमे, दाक्षिणात्य सिनेमातील एंट्री, लवकरच रंगभूमीवर येणारं नाटक आणि जीवनात नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न यामुळं सध्या नम्रता गायकवाडची अवस्था जणू काही ''आज मैं ऊपर आसमाँ नीचे'' अशी काहीशी झालीय.

Web Title: Today i am up ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.