‘देसी गर्ल’ची निर्मिती असलेला तिसरा मराठी सिनेमा फायरब्रांड,हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 14:59 IST2018-03-23T09:29:10+5:302018-03-23T14:59:10+5:30

'व्हेंटिलेटर' आणि 'काय रे रास्कला' या सिनेमांना मराठी रसिकांनी डोक्यावर घेतलं.सिनेमाची कथा आणि या सिनेमांमधील कलाकारांचा अभिनय रसिकांना भावला.या ...

The third role of the production of 'Desi Girl', which is the main role of the artist, is the firebrand | ‘देसी गर्ल’ची निर्मिती असलेला तिसरा मराठी सिनेमा फायरब्रांड,हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

‘देसी गर्ल’ची निर्मिती असलेला तिसरा मराठी सिनेमा फायरब्रांड,हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

'
;व्हेंटिलेटर' आणि 'काय रे रास्कला' या सिनेमांना मराठी रसिकांनी डोक्यावर घेतलं.सिनेमाची कथा आणि या सिनेमांमधील कलाकारांचा अभिनय रसिकांना भावला.या सिनेमातील प्रत्येक गोष्ट रसिकांना भावली.या सिनेमांची आणखी एक खासियत होती ती म्हणजे या दोन्ही सिनेमांची निर्मिती बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने केली होती.व्हेंटिलेटर सिनेमाच्या माध्यमातून प्रियंकाने मराठी सिनेनिर्मिती क्षेत्रा पाऊल ठेवले.या सिनेमाला रसिकांनी डोक्यावरही घेतले.शिवाय राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही व्हेंटिलेटरचा डंका वाजला.आता प्रियंका चोप्रा तिसरा मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे.तिच्या तिस-या मराठी सिनेमाचे नाव 'फायरब्रांड' असे असं आहे.या सिनेमाचं दिग्दर्शन अरुणा राजे करणार आहेत.याआधी 'रिहाई' आणि 'गहराई' या सिनेमांचं दिग्दर्शन अरुणा राजे यांनी केलं आहे.आता फायरब्रांड सिनेमाच्या निमित्ताने प्रियंकाने त्यांच्यावर मोठी धुरा सोपवली आहे.प्रियंकाच्या सिनेमात कायमच दिग्गज मराठी कलाकारांची फौज असते.आता 'फायरब्रांड' या सिनेमातही दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी रसिकांना पाहायला मिळणार आहे.या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री उषा जाधव,गिरीश कुलकर्णी,सचिन खेडेकर आणि राजेश्वरी सचदेव अशा दिग्गज कलाकारांच्या भूमिका फायरब्रांड या सिनेमात आहे.या सिनेमात उषा जाधव वकीलाची भूमिका साकारणार असून गिरीश कुलकर्णी तिच्या आर्किटेक्ट पतीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या फायरब्रांड या शीर्षकावरुनच या सिनेमाची कथा हटके असणार असं बोललं जात आहे.या सिनेमातूनही मराठी रसिकांना मनोरंजनाची अनोखी ट्रीट मिळणार आहे.त्यामुळे आता प्रियंका चोप्राच्या या तिस-या मराठी सिनेमाची रसिकांनाही तितकीच प्रतीक्षा नक्कीच असणार यांत शंका नाही. 

Also Read:'व्हेंटीलेटर' सिनेमाच्या गुजराती रिमेकमध्ये झळकणार जग्गुदादा

व्हेंटिलेटर या मराठी सिनेमाचं नाट्य रुपांतर गुजराती रंगभूमीवर आणण्याचा निर्धार राजेश जोशी यांनी केला आहे.व्हेंटिलेटर सिनेमाचं गुजराती नाट्य रुपांतर होत असल्याबद्दल व्हेंटिलेटर सिनेमाची निर्माती प्रियांका चोप्राच्या आई डॉ. मधु चोप्रा यांनीही आनंद व्यक्त केला आहे.एखाद्या गाजलेल्या सिनेमाचं नाट्य रुपांतर होणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे.सिनेमानं राष्ट्रीय पातळीवर डंका वाजवला आहे,रसिकांची मनं जिंकली आहेत.आता तेच प्रेम गुजराती रसिकांकडून गुजराती रंगभूमीवरही मिळावं अशी अपेक्षा मधु चोप्रा यांनी व्यक्त केली आहे.'व्हेंटिलेटर' सिनेमा नाट्य रुपांतर करुन रंगभूमीवर आणताना त्या सिनेमाच्या कथेत कोणताही बदल केला जाणार नाही.फक्त गुजरात नाट्य रसिकांची आवड लक्षात घेऊन सिनेमाची कथा मांडण्याचा प्रयत्न राजेश जोशी करणार आहेत.यापैकी नाटकातील काही सीन्स पाहिल्याचे आणि ते योग्यरित्या मांडल्याचं मधु चोप्रा यांनी सांगितले आहे.राजेश जोशी यांचं 'कोडमंत्र' हे नाटक सध्या गुजरात रंगभूमीवर तुफान गाजत आहे.गुजराती नाट्य रसिकांची मनं जिंकणारं हे नाटक गुजराती रंगभूमीवरील सगळ्यात महागडं नाटक असल्याचं बोललं जात आहे. 

Web Title: The third role of the production of 'Desi Girl', which is the main role of the artist, is the firebrand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.