या खास व्यक्तिंनी दिली ​सोनाली कुलकर्णीला गुलाबजामच्या सेटवर भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 19:21 IST2017-04-07T13:51:10+5:302017-04-07T19:21:10+5:30

सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येदेखील तिचे खास प्रस्थ निर्माण केले आहे. पुणे 52, रिंगा रिंगा, देऊळ यांसारख्या मराठी ...

These special people visited Sonali Kulkarni on Gulabjam's set | या खास व्यक्तिंनी दिली ​सोनाली कुलकर्णीला गुलाबजामच्या सेटवर भेट

या खास व्यक्तिंनी दिली ​सोनाली कुलकर्णीला गुलाबजामच्या सेटवर भेट

नाली कुलकर्णीने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येदेखील तिचे खास प्रस्थ निर्माण केले आहे. पुणे 52, रिंगा रिंगा, देऊळ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिच्या सगळ्याच भूमिकांचे कौतुक झाले आहेत. तसेच तिला आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटासाठीदेखील तिला अनेक पुरस्कार मिळले आहेत. डरना जरूरी है, मिशन काश्मीर, दिल चाहता है यांसारख्या हिंदी चित्रपटातही तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सोनाली सध्या तिच्या एका नव्या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे आणि या चित्रपटाच्या सेटवर तिला एक खूपच चांगले सरप्राइज मिळाले असून त्यासाठी ती खूपच खूश आहे. 
सोनालीच्या गुलाबजाम या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात सोनाली प्रमुख भूमिकेत झळकणार असून या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर तिच्यासोबत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले होते आणि त्यासोबतच आमच्या रेसिपीला सुरूवात झाली असे कॅप्शन देण्यात आले होते. सचिन कुंदलकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून वजनदार या चित्रपटाच्या यशामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. गुलाबजाम या चित्रपटाच्या सेटवर नुकतेच सोनालीचे आई बाबा आले होते. त्यांना पाहून ती खूपच आनंदित झाली होती. तिने याबाबत तिच्या ट्विटवर अकाऊंटवर ट्वीटदेखील केले आहे. तिने तिच्या आईवडिलांसोबत एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यावर माझे आई बाबा सेटवर आले होते. त्यामुळे मला खूपच बरे वाटत आहे असे लिहिले आहे. त्यांच्या कुटुंबाच्या या फोटोमध्ये सचिन कुंदलकरदेखील दिसत आहे. 

Web Title: These special people visited Sonali Kulkarni on Gulabjam's set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.