या सात मराठी चित्रपटांची झाली पिफमध्ये निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 11:41 IST2017-01-10T11:41:26+5:302017-01-10T11:41:26+5:30

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध स्पर्धात्मक विभागात निवड झालेल्या ...

These seven Marathi films were selected in PIFF | या सात मराठी चित्रपटांची झाली पिफमध्ये निवड

या सात मराठी चित्रपटांची झाली पिफमध्ये निवड

णे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध स्पर्धात्मक विभागात निवड झालेल्या चित्रपटांच्या नावांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली. येत्या १२ ते १९ जानेवारी, २०१७ दरम्यान होणा-या या महोत्सवातील चित्रपटांची अधिक माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पटेल बोलत होते. पत्रकार परिषदेत वर्ल्ड कॉम्पिटिशन अंतर्गत निवड झालेल्या जगभरातील १४ चित्रपटांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये लेडी आॅफ दी लेक या हौबम पबन कुमार दिग्दर्शित भारतीय चित्रपटाचाही समावेश आहे. याबरोबरच स्टुडण्ट कॉम्पिटिशनमध्ये लाईव्ह अ‍ॅक्शन व अ‍ॅनिमेशन असे दोन भाग असून यातील लाईव्ह अ‍ॅक्शन विभागात १३ तर अ‍ॅनिमेशन विभागात १६ चित्रपटांचा समावेश आहे. तसोच यंदाच्या पिफमध्ये सात मराठी चित्रपट पाहण्याची संधी देखील प्रेक्षकांना मिळणार आहे. खालील सात मराठी चित्रपट यंदाच्या पिफमध्ये झळकणार आहेत. 
डॉक्टर रखमाबाई - दिगदर्शक - अनंत नारायण महादेवन
लेथ जोशी - दिगदर्शक - मंगेश जोशी
व्हेंटीलेटर- दिगदर्शक - राजेश मापुस्कर
एक ते चार बंद - दिगदर्शक - अपूर्वा साठे
दशक्रिया - दिगदर्शक - संदीप भालचंद्र पाटील
घुमा - दिगदर्शक - महेश रावसाहेब काळे
नदी वाहते - दिगदर्शक - संदीप सावंत
यावर्षी १२ ते १९ जानेवारी दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरणार असून पुणे आणि पिंपरीचिंचवड शहरा आठ ठिकाणी १३ स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट पाहता येणार आहे. यामध्ये सिटी प्राईडकोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता, सिटी प्राईड आर डेक्कन, मंगला मल्टिप्लेक्स, आयनॉक्स बंडगार्डन रस्ता, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि चिंचवड येथील कार्निव्हल सिनेमा व आयनॉक्स या चित्रपट गृहांचा समावेश आहे. 

Web Title: These seven Marathi films were selected in PIFF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.