'मंत्र' मधल्या छोट्या भूमिकाही झाल्यात लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 12:48 IST2018-04-14T07:18:03+5:302018-04-14T12:48:03+5:30

शुक्रवारी रिलीज झालेल्या ड्रीमबुक प्रोडक्शन्स  आणि वेदार्थ क्रिएशन्सच्या ‘मंत्र’ मधल्या अगदी छोट्या छोट्या भूमिकांत काम केलेल्या  कलाकारांच्या अभिनयाची  प्रशंसा ...

There is also a small role in 'Mantra' | 'मंत्र' मधल्या छोट्या भूमिकाही झाल्यात लक्षवेधी

'मंत्र' मधल्या छोट्या भूमिकाही झाल्यात लक्षवेधी

क्रवारी रिलीज झालेल्या ड्रीमबुक प्रोडक्शन्स  आणि वेदार्थ क्रिएशन्सच्या ‘मंत्र’ मधल्या अगदी छोट्या छोट्या भूमिकांत काम केलेल्या  कलाकारांच्या अभिनयाची  प्रशंसा होत आहे. शुभंकर एकबोटेचा ‘सनी’ हा प्रेक्षकांना चित्रपटभर त्याच्या सहज विनोदाने हसवत राहतो. विशेष म्हणजे हसण्याची एकही जागा निव्वळ विनोद नसून त्याच स्वभाव वैशिष्ट्य म्हणून समोर येत इतक सहज काम शुभांकरने केल आहे. वडिलांच्या धाकाने इच्छेविरुध्द राजकारणात ओढला जाणारा सनी डेविडच्या क्लुप्त्यानी आचंबित होत राहतो, पोस्टरवर नाव लागणार म्हणून खुश होतो, हळूहळू त्याला कार्यकर्त्यांच भान येऊ लागत आणि शेवटी मित्राला होणारा त्रास बघून त्याला अपराधी वाटत. सनीच्या या सगळ्या प्रवासात शुभंकरन त्याची देहबोली आणि संवादाची लकब फार बारकाइन साकारली आहे. चित्रपटातील निरंजनच्या आईचे काम करणाऱ्या वृषाली काटकर आणि आजीचे  काम करणाऱ्या अनुराधा मराठे या खर तर गायिका पण दोघींनीही ती पात्र सहज वावरान जिवंत केली आहेत. वृषालीची आई तर न बोलताही प्रत्येक प्रसंगात व्यक्त होत राहते. शुभांगी दामले यांची अंतराची आजीही तिचा प्रसंग गाजवून जाते.

जो पैसे मिळवायला मित्रालाही प्याद करू शकतो असा अतीमहत्वाकांक्षी डेविड रंगवणाऱ्या सुजय जाधवचाही हा पहिलाच चित्रपट. या शिवाय धीरेश जोशीचा काका, सिद्धेश्वर झाडबुके यांचा नगरसेवक आंबवणे, सुनील अभ्यंकर यांचा नाडकर्णी सर आणि विश्वजित जोशी यांचा रास्तेही कुठेही अभिनय करतात असं वाटत नाही. 

मंत्र या चित्रपटात मनोज जोशी, सौरभ गोगटे, शुभंकर एकबोटे यांनी कामं चांगली केली आहेत. पुष्कराज चिरपुटकरने काशिनाथ ही व्यक्तिरेखा खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे. सौरभने तर शेवटच्या काही दृश्यांमध्ये जबरदस्त अभिनय केला आहे. 

Web Title: There is also a small role in 'Mantra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.