फ्लाइट ९० मिनिटं उशीरा झाली तरीही कंपनीनं मागितली नाही माफी, अभिनेता जितेंद्र जोशीनं व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 04:27 PM2023-11-02T16:27:38+5:302023-11-02T16:28:07+5:30

Jitendra Joshi : मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि गुणी अभिनेता जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर त्याला फ्लाइटचा आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे.

The flight departed more than 90 minutes late, Jitendra Joshi expressed his anger on social media | फ्लाइट ९० मिनिटं उशीरा झाली तरीही कंपनीनं मागितली नाही माफी, अभिनेता जितेंद्र जोशीनं व्यक्त केला संताप

फ्लाइट ९० मिनिटं उशीरा झाली तरीही कंपनीनं मागितली नाही माफी, अभिनेता जितेंद्र जोशीनं व्यक्त केला संताप

सोशल मीडियावर बरेच कलाकार सक्रीय असतात आणि ते या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात. तसेच बऱ्याचदा ते आजूबाजूला घडणाऱ्या घटनेवरदेखील व्यक्त होताना दिसतात. नुकतेच मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि गुणी अभिनेता जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर संतापकजनक पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याला इंडिगो फ्लाइटचा आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे.

अभिनेता जितेंद्र जोशीने इंस्टाग्राम स्टोरीवर फ्लाइटमधला फोटो शेअर केला आहे. त्याने फोटोवर लिहिले की, बुलशीट..!!! इंडिगो, तुम्ही तुमची सर्व प्रतिष्ठा आणि आदर गमावला आहे. त्याने पुढे म्हटले की, फ्लाइट ९० मिनिटांहून जास्त उशीरा आली आणि असे असूनही माफीदेखील मागण्यात आली नाही. अभिनेत्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

जितेंद्र जोशीने दर्जेदार अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अलिकडेच त्याच्या 'गोदावरी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याने फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही काम केले आहे. तो फक्त अभिनेता नाही तर गीतकारही आहे. त्याने 'मुरांबा' सिनेमातील 'अगं ऐक ना' हे गाणं लिहिलं आहे. याशिवाय जत्रा सिनेमातील लोकप्रिय गाणं 'कोंबडी पळाली' हे गाणं जितेंद्रनेच लिहिलं आहे. जितेंद्र नाळ २ चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: The flight departed more than 90 minutes late, Jitendra Joshi expressed his anger on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.