​अंकुश चौधरी आणि तेजस्विनी पंडितच्या देवा एक अतरंगी या चित्रपटाचे अनोख्या पद्धतीत झाले टीझर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 15:26 IST2017-10-27T09:56:00+5:302017-10-27T15:26:00+5:30

देवा एक अतरंगी हा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या आयुष्यात नवा रंग भरण्यास सज्ज झाला आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स ...

Tejhar Launch, Ankush Chaudhary and Tejaswini Pundit's Dev An Atangi | ​अंकुश चौधरी आणि तेजस्विनी पंडितच्या देवा एक अतरंगी या चित्रपटाचे अनोख्या पद्धतीत झाले टीझर लाँच

​अंकुश चौधरी आणि तेजस्विनी पंडितच्या देवा एक अतरंगी या चित्रपटाचे अनोख्या पद्धतीत झाले टीझर लाँच

वा एक अतरंगी हा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या आयुष्यात नवा रंग भरण्यास सज्ज झाला आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित 'देवा' या सिनेमाच्या टीझरचे नुकतेच दादर येथील प्लाझा सिनेमागृहात अनोख्या शैलीत सादरीकरण करण्यात आले. प्लाझा सिनेमागृहातील संपूर्ण स्टाफ आणि टेक्निशियन्सच्या हस्ते या टीझरचे लाँच करण्यात आले. कोणताही सिनेमा पडद्यावर साकार होण्यामागे पडद्यामागील टेक्निशियन्स आणि युनिट मेंबरचा महत्त्वाचा हातभार असतो. त्यामुळे 'देवा' सिनेमाच्या संपूर्ण टीमने आपल्या पहिल्या टीझरच्या अनावरण सोहळ्यात प्लाझा सिनेमागृहातील सर्व कर्मचाऱ्यांना सोबतीला घेत मराठी सिनेसृष्टीत एक नवा पायंडा उभारला. 
दक्षिणात्य दिग्दर्शक मुरली नल्लप्पा दिग्दर्शित देवा एक अतरंगी हा सिनेमा १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या टीझरमधून मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी पंडित एका नव्या लुकमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. या चित्रपटात ती लेखिकेच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये तिने साकारलेल्या 'माया' या व्यक्तिरेखेच्या नजरेतून 'देवा' चा शोधप्रवास आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवाय अतरंगी देवाच्या रंगबेरंगी छटा या ट्रेलरमध्ये दिसून येत आहेत. तसेच डॉ. मोहन आगाशे, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार हे कलाकारदेखील या टीझरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या 'देवा' सिनेमाच्या पोस्टर आणि मोशन पिक्चर्समध्ये आतापर्यंत पाठमोरा दिसणारा अंकुश चौधरीदेखील प्रेक्षकांसमोर आला असल्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा टीझर खास ठरत आहे. मायाच्या नजरेतला हा 'देवा' प्रेक्षकांसाठी मोठा कुतूहलाचा विषय बनत आहे. 
देवा एक अतरंगी या सिनेमाचा टीझर लाँच झाल्यापासून प्रेक्षक या टीझरचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक करत आहेत. देवा या चित्रपटातील अंकुशच्या लूकची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. रंगीत सदरा, फॅन्सी लॉकेट, हातात माळ, इयर रिंग्स आणि केसांची मॉडर्न स्टाईल असा या चित्रपटातील अंकुशचा लूक असणार आहे. या लूकप्रमाणेच या चित्रपटातील त्याची भूमिकादेखील काहीशी हटके असणार आहे. या चित्रपटात तो प्रत्येकाला मदत करण्यास तत्पर असणाऱ्या एका व्यक्तिची भूमिका साकारणार आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव देवा असून तो सगळ्यांचा लाडका दाखवला जाणार आहे.

Read : ग्लॅमरस अंदाजात साकारण्यात आला अमृता खानविलकर आणि अंकुश चौधरी यांचा मेणाचा पुतळा

Web Title: Tejhar Launch, Ankush Chaudhary and Tejaswini Pundit's Dev An Atangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.