'तेजस्विनी' पंडीतची बातच न्यारी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2017 18:12 IST2017-05-06T12:42:47+5:302017-05-06T18:12:47+5:30
फॅशन का है जलवा म्हणत बॉलिवूडमध्ये विविध सेलिब्रिटी फॅशन ब्रँडसच्या व्यवसायात उतरले आहेत. दीपिका पादुकोण, आलिया भट, श्रद्धा कपूर, ...

'तेजस्विनी' पंडीतची बातच न्यारी !
फ शन का है जलवा म्हणत बॉलिवूडमध्ये विविध सेलिब्रिटी फॅशन ब्रँडसच्या व्यवसायात उतरले आहेत. दीपिका पादुकोण, आलिया भट, श्रद्धा कपूर, कंगणा राणौत, सोनम कपूर, शिल्पा शेट्टी, बिपाशा बासू, हृतिक रोशन, जॉन अब्राहम यांनी आपापले फॅशन ब्रँड्स आणून फॅशन डिझायनर बनले आहेत. मात्र यांत बी-टाऊनच्या अभिनेत्रीच नायकांपेक्षा आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते आहे. यांत आपल्या मराठी नायिकाही मागे नाहीत. त्यांनीही फॅशन ही गोष्ट अधिक गांभीर्यानं घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र यांत मराठी नायिकांनी आपलं वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःचा फॅशन ट्रेंड सुरु करण्यात मराठीमध्ये पहिला नंबर लावला तो अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या मराठमोळ्या अभिनेत्रींनी. दोन वर्षांआधी या दोघींनी मिळून तेजाज्ञा या फॅशन ब्रँडची सुरुवात केली. भारतीय महिला वस्त्रांमधील आभूषण म्हणजेच साडी. साडीला अनोख्या रुपात सा-यांसमोर आणणा-या एक पाऊल पुढे टाकत या दोन्ही नायिकांनी वेस्टर्न कपड्यांना पारंपरिक लूक दिला आहे. त्यांचे नवे कलेक्शन बाजारात आणले आहे. ट्रेंडी तरीही पारंपारिक अशा लूकमधील फोटो तेजस्विनीने ट्विट केलाय. तेजस्विनीचा हा नवा लूक सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. हिरव्या रंगाचा शॉर्ट फ्रॉक तेजस्विनीने यांत परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा फ्रॉक खणाच्या कापडापासून तयार करण्यात आलाय. डोक्यावर पुणेरी पगडी, नाकात चांदीची नथ कपळावर चंद्रकोर आणि पायात कोल्हापुरी असा हा तिचा लूक रसिकांच्या पसंतीला पात्र ठरतो आहे. याआधी या दोघींनी खणाच्या साड्यांना वेगळा लूक दिला होता. महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग असणा-या खणाच्या साड्या सा-यांसमोर आणल्या होत्या. या मराठमोळ्या नायिकांनी खणाच्या साड्यांना अनोख्या अंदाजात सा-यांसमोर आणलं. या खणाच्या साड्यांना वेगळ्या रंगरुपात त्यांनी सादर केलं. या खणाच्या साड्या रसिकांना पसंतीस पात्र ठरल्या होत्या. त्याचप्रमाणे आता वेस्टर्न कपड्यांना दिलेला नवा लूकही रसिकांना नक्कीच आवडेल यांत शंका नाही.