दुबईच्या गार्डनमधून तेजस्विनी पंडितने शेअर केले फोटो, दिसली ग्लॅमरस लूकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 16:20 IST2020-12-07T16:12:34+5:302020-12-07T16:20:03+5:30
सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

दुबईच्या गार्डनमधून तेजस्विनी पंडितने शेअर केले फोटो, दिसली ग्लॅमरस लूकमध्ये
अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना देत असते. नुकतेच तेजस्विनी तिच्या इन्स्टाग्रामवर दुबईतल्या मिरॅकल गार्डनमधले फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तेजस्विनीच्या मागे खूप सुंदर फुल दिसतायेत. तेजस्विनी ही इतकीच सुंदर दिसतेय. फोटोवरुन लक्षात येतं सध्या ती दुबईमध्ये आहे. मात्र दुबईत ती व्हॅकेशन एन्जॉय करायला गेलीय की शूटिंगसाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण दुबईतल्या तेजस्विनीचे फोटो तिच्या फॅन्सना नक्कीच आवडले आहेत. त्यांनी लाईक्सच्या माध्यमातून आपली पसंती दर्शवली आहे.
तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.
मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.