मी अभिमानाने आरशात बघते... तेजस्विनी पंडितच्या 'संवेदनशील' पोस्टवर कौतुकाचा वर्षाव !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 03:30 PM2021-04-26T15:30:35+5:302021-04-26T15:48:04+5:30

Tejaswini pandit donate her blood :आता मराठी कलाकार कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

Tejaswini pandit donate her blood social media appreciate her work | मी अभिमानाने आरशात बघते... तेजस्विनी पंडितच्या 'संवेदनशील' पोस्टवर कौतुकाचा वर्षाव !

मी अभिमानाने आरशात बघते... तेजस्विनी पंडितच्या 'संवेदनशील' पोस्टवर कौतुकाचा वर्षाव !

googlenewsNext

भारतात सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.अनेक रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा परिस्थितीत आता मराठी कलाकार कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने रक्तदान केले आहे आणि इतरांनाही रक्दान करण्याचे आवाहन केलं आहे. रक्तदान करतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत तिने एक मोठी पोस्ट देखील लिहिली आहे. तेजस्विनी म्हणते, अभिमानाने आरशात बघता आलं पाहिजे...- असं माझे बाबा म्हणायचे.  झाकल्या मूठीने मदत केली की लोक म्हणणार तुम्ही काहीच करत नाही...केलेली मदत दाखवली की म्हणणार पब्लिसिटी साठी केली. जमेल तशी केली की म्हणणार एवढीशी का केली ? पण 'तेवढीशी ' का होईना केली ना, किमान हातावर हात धरून तर नाही बसलो....!

समाजकल्याण करताना कॅमेरा घरी ठेवायचा. - ( ही पण माझ्या बाबांची शिकवण ) पण आजच्या डिजिटल युगात जाहीर करावं लगतं. कारण कलाकार कॅमेराच्या मागेही अभिनयच करत असतो असं बहुतेकांना वाटतं... पण तसं नाही आहे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्याची जाण मला एक कलाकार म्हणून आहे, कारण मुळात कलाकार हा संवेदनशीलच असतो... समाजातील एकाला जरी माझ्या ह्या कृतीतून प्रेरणा मिळाली तरी माणूस म्हणून काहीतरी करू शकले याचं समाधान असेल. आपण चांगलं कर्म करत रहायचा...त्याची नोंद बाकी कुठे नाही, तरी 'तिथे वर' होत असते. तेंव्हा, मला जमेल तसं, जमेल तेंव्हा झाकल्या मूठीने ( जसं गेले अनेक वर्ष करत आले ) आणि आता जमेल तेंव्हा जाहीर करून मदत करत राहीन. कारण मी आजही 'स्वतःला अभिमानाने आरशात बघते.' अशा शब्दांत तेजस्विनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Web Title: Tejaswini pandit donate her blood social media appreciate her work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.