डॉक्टर रखमाबाई साकारणे खूप कठीण असे तनिषा चॅटर्जी सांगतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 11:37 IST2017-02-23T06:07:52+5:302017-02-23T11:37:52+5:30

तनिषा चॅटर्जी डॉ. रखुमाबाई या चित्रपटात रखुमाबाईची भूमिका साकारत आहे. रखुमाबाई यांची भूमिका सााकरणे खूप कठीण असल्याचे तनिषा सांगते. ...

Tanisha Chatterjee tells doctors that it is very difficult to make a doctor | डॉक्टर रखमाबाई साकारणे खूप कठीण असे तनिषा चॅटर्जी सांगतेय

डॉक्टर रखमाबाई साकारणे खूप कठीण असे तनिषा चॅटर्जी सांगतेय

िषा चॅटर्जी डॉ. रखुमाबाई या चित्रपटात रखुमाबाईची भूमिका साकारत आहे. रखुमाबाई यांची भूमिका सााकरणे खूप कठीण असल्याचे तनिषा सांगते. तनिषाला ही भूमिका सााकरण्यासाठी खूप अभ्यास करावा लागला असेदेखील ती सांगते. रखुमाबाई या खऱ्या आयुष्यातील नायिका होत्या. त्यांना मोठ्या पडद्यावर साकारणे नक्कीच सोपे नव्हते असे तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे.
तनिषाच्या करियरसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. या चित्रपटाविषयी ती सांगते, "रखुमाबाई यांनी केलेले कार्य हे खूप मोठे होते. त्यामुळे या कार्याचा सन्मान आम्ही आमच्या चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहोत. आम्ही त्यांच्या कार्याला योग्य न्याय देऊ असे आम्हाला वाटते. प्रॅक्टिस करणाऱ्या त्या पहिल्या महिला डॉक्टर असल्या तरी त्यांच्याबद्दल अनेकांना माहीतच नाही आहे. मी हा चित्रपट करण्याआधी त्यांच्यावरचे पुस्तक वाचले होते. हे पुस्तक वाचून मी हादरून गेले. रखुमाबाई यांचा प्रवास खूप रोमांचक आहे. त्यांचा मृत्यू 91 वर्षी झाला. त्यामुळे त्यांच्या तरुणपणापासून ते वृद्धपकाळापर्यंतचा काळ चित्रपटात दाखवला जाणार आहे. मला या चित्रपटासाठी मराठी ही भाषा शिकावी लागली. कारण या चित्रपटात मध्यंतरापर्यंत मराठी भाषा बोलली गेली आहे. पण नंतरच्या चित्रपटात अनेक भाषांचा समावेश आहे. त्या लहान असताना मराठीत बोलत होत्या आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये शिकायला गेल्यानंतर त्या इंग्रजीत बोलत असत. तसेच त्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये रुग्णालयाची स्थापना केली. त्यावेळी त्या गुजराती आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलत असत. त्यामुळे मला भाषेवर खूप मेहनत घ्यावी लागली. त्या एक स्त्री असल्याने त्यांच्याकडून उपचार घेण्यास लोक नकार देत असत या गोष्टी मला त्यांच्या पुस्तकातून कळल्या. त्या वयाच्या 90 वर्षांपर्यंत रोज रुग्णालयात हजेरी लावत असत. त्यांचा वयाच्या 11 व्या वर्षी बालविवाह झाला होता." 

Web Title: Tanisha Chatterjee tells doctors that it is very difficult to make a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.