ती तलवार पोवाडयात श्रेयसचा रांगडा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 15:04 IST2017-01-28T09:34:31+5:302017-01-28T15:04:31+5:30
बघतोस काय मुजरा कर या चित्रपटामधील ती तलवार या पोवाडयाची झलक नुकतीच सोशल साईट्सवर उलगडली आहे. या पोवाडयामध्ये आपल्याला ...
.jpg)
ती तलवार पोवाडयात श्रेयसचा रांगडा अंदाज
ब तोस काय मुजरा कर या चित्रपटामधील ती तलवार या पोवाडयाची झलक नुकतीच सोशल साईट्सवर उलगडली आहे. या पोवाडयामध्ये आपल्याला मराठमोळा मुलगा क्षेयस तळपदेचा एक अलग अंदाज बघायला मिळतोय. अंगावर शहारे येतील असे शब्द असलेला ती तलवार हा पोवाडा क्षितीज पटवर्धनने शब्दबदध केला आहे. या पोवाडयामध्ये श्रेयस रांगडया अंदाजात पाहायला मिळतोय. डोक्यावर फेटा, कानात बाळी, कपाळी टिळा अशा ग्रामीण बाज असलेल्या वेशात श्रेयस या पोवाडयात पाहायला मिळतोय. जोशपुर्ण आवाजात श्रेयसने या पोवाड्यात अभिनय करण्याचा प्रयत्न केलाय. आता महाराजांची शौर्यगाथा पोवाडयाच्या रुपात सांगायची तर प्रेक्षकांच्या मनापर्यंत ती पोहचायलाच हवी. म्हणुनच श्रेयस या पोवाडयात एकदम पेटून उठलेला दिसतोय. बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची बºयाच दिवसांपासुन चर्चा आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोने याने केले आहे. हेमंत म्हणतोय, महाराजांच्या ज्या तलवारीनं हिंदवी स्वराज्य आणलं ती तलवार आता पुन्हा तळपण्याची गरज आहे... सादर करतोय ती तलवार... अशा तडफदार शब्दांमध्ये ती तलवार हे गाणे प्रेक्षकांच्या समोर आलेले आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, अक्षय टांकसाळे, जितेंद्र जोशी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही कारण ३ फेब्रुवारी २०१७ ला सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज देखील झाला आहे. महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांची गड अन किल्ले... काय अवस्था करुन ठेवली आहे आपण? जिथे महाराजांनी आणि मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वत:चं रक्त सांडलं तिथे बसून दारु प्यावी, गुटखा खाऊन थुकावं हा विचार कुठून येत असेल? इंग्रजानी इतिहास कसा जपून ठेवला आहे. आपल्याकडे होईल का असं? असे कित्येक प्रश्न या टिझर मध्ये विचारण्यात आले आहेत. हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली असणार आहे. फक्त आता तुम्हाला काहीच दिवस महाराजांची ही शौर्य गाथा पाहण्यासाठी वाट बघावी लागणार आहे.