अभिनेत्री मनावाने संसाराची सुरूवात केली एक स्विट सेल्फीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 18:04 IST2017-03-24T12:34:27+5:302017-03-24T18:04:27+5:30

नुकतेच अभिनेत्री मनवा नाईकचे निर्माता सुशांत तुंगारेसह धुमधडाक्यात शुभमंगल पार पडले आहे.या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील कलाकरांनी या दोघांनी शुभेच्छा ...

A Sweet Selfie, the actress started her new life | अभिनेत्री मनावाने संसाराची सुरूवात केली एक स्विट सेल्फीने

अभिनेत्री मनावाने संसाराची सुरूवात केली एक स्विट सेल्फीने

कतेच अभिनेत्री मनवा नाईकचे निर्माता सुशांत तुंगारेसह धुमधडाक्यात शुभमंगल पार पडले आहे.या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील कलाकरांनी या दोघांनी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. आता लग्नाच्या गडबडीतून मनवाला उसंत मिळाली आहे. संसाराची सुरूवात करतानाचा तिने तिच्या पती सुशांतसह एक गोड सेल्फी क्लिक करत सोशल साईटसवर अपलोड केला आहे. आयुष्याची सुरूवात करतानाचा या दोन्ही जस्ट मॅरिड कपलच्या चेह-याचा आनंद स्पष्ट दिसतोय. मनवा आणि सुशांताचा रोमँटीक सेल्फीलाल त्याच्या चाहत्यांकडूनही खूप सा-या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. अनेकांना मनावाचे लग्नही सरप्राईज मिळाल्यासारखे वाटत असल्याचे कमेंटही दिल्या आहेत. मात्र मनवाच्या लग्नाने तिच्या चाहत्यांनी आनंद तर व्यक्त केलेच आहे मात्र काही डायहार्ट चाहत्यांचे मात्र काळजाचे तुकडे तुकडे झाले असणार हे मात्र नक्की. असो, मनावाच्या नव्या इनिंगसाठी आमच्याकडूनही खूप सा-या शुभेच्छा.  या मनवाने नुकतेच निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या छोट्या पडद्यावरील मालिकेची तिने सुशांत तुंगारेसह निर्मिती केली आहे. सुशांत हाही एक प्रसिद्ध निर्माता असून, त्याने मालिकांची निर्मिती केली आहे. याआधी आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे मराठी मनोरंजन दुनियेतील अभिनेता आणि अभिनेत्री रेशीमगाठीत अडकले आहेत.अभिनेत्री मृण्मयी देशपांडे,श्रृती मराठे, पल्लवी पाटील या अभिनेत्री कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.

Web Title: A Sweet Selfie, the actress started her new life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.