​स्वप्निल म्हणतोय, या गोष्टीवर लोकांचा नक्कीच विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 10:50 IST2016-10-19T10:49:43+5:302016-10-19T10:50:43+5:30

स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे फुगे या चित्रपटात प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट करण्याचा विचार या दोघांनी ...

Swapnil says, people will not believe in this matter | ​स्वप्निल म्हणतोय, या गोष्टीवर लोकांचा नक्कीच विश्वास बसणार नाही

​स्वप्निल म्हणतोय, या गोष्टीवर लोकांचा नक्कीच विश्वास बसणार नाही

वप्निल जोशी आणि सुबोध भावे फुगे या चित्रपटात प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट करण्याचा विचार या दोघांनी जिममध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करताना केला असे स्वप्निल सांगतो. एवढेच नव्हे तर आम्ही दोघेही जिममध्ये जातो, यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही ही कोपरखळीदेखील स्वप्निलने मारली. 
स्वप्निल जोशीने नुकताच त्याचा वाढदिवस फुगे या त्याच्या आगामी चित्रपटाच्या टीमसोबत साजरा केला. यावेळी त्याच्या या चित्रपटाचा पहिला लुकही लाँच करण्यात आला. तसेच या चित्रपटातील एका गाण्याचे कडवेदेखील ऐकवण्यात आले. यावेळी स्वप्निलने फुगे या चित्रपटाबाबतची अनेक गुपितेही शेअर केली. या चित्रपटाची कथा ही स्वप्निल आणि सुबोध यांनी लिहिली आहे. याविषयी स्वप्निल सांगतो, "मी आणि सुबोध हे अनेक वर्षांपासून खूप चांगले फ्रेंड्स आहोत. एकमेकांसोबत काम करण्याची आमची दोघांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. काही वर्षांपूर्वी आम्हाला एक चित्रपट ऑफरदेखील करण्यात आला होता. पण काही कारणाने हा चित्रपट होऊ शकला नाही. त्यामुळे कोणीही चित्रपटासाठी विचारण्याची वाट न पाहाता मी आणि सुबोधनेच एका कथेवर काम केले आणि त्या कथेवर चित्रपट करण्याचे ठरवले आणि अशाप्रकारे फुगे या चित्रपटाच्या प्रवासाला सुरुवात झाली."

Web Title: Swapnil says, people will not believe in this matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.