स्वप्नील जोशी कोणाला म्हणतो पार्टी दे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 14:08 IST2017-01-07T14:08:55+5:302017-01-07T14:08:55+5:30
प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी याने नुकताच सोशलमीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पार्टी दे पार्टी ...

स्वप्नील जोशी कोणाला म्हणतो पार्टी दे?
प रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी याने नुकताच सोशलमीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पार्टी दे पार्टी दे असा म्हणत आहे. मात्र तो नक्की कोणला पार्टी मागत आहे हा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल. तर ऐका स्वप्नील जोशी हा त्याच्या आगामी चित्रपटाचा प्रमोशनचा हा फंडा आहे. पार्टी दे...पार्टी दे हे त्याच्या आगामी चित्रपटातील गाणे आहे. हे गाणं अमितराज याने गायले असून संगीतदेखील त्याने दिले आहे. तर या गाण्याचे लिखाण क्षितीज पटवर्धन याने केले आहे. हे गाणे सध्या खूपच गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशलमीडियावरदेखील या गाण्याला प्रचंड पसंती मिळाली आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित होणार होता. मात्र काही अडचणींमुळे हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला आहे. पूर्वी ही या चित्रपटाचे प्रमोशन ही भन्नाट पाहायला मिळाले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार फुगे घेऊन डान्स करत असतानाचे काही व्हिडीओ मध्यंतरी सोशलमीडियावर पाहायला मिळाले आहे. आता पुन्हा या चित्रपटाचे प्रमोशन जोरात चालू असल्याचे दिसत आहे. याच चित्रपटातील पार्टी दे पार्टी दे या गाण्यावर अभिनेता स्वप्नील जोशी चाहत्यांकडून सोशलमीडियावर व्हिडीओ मागत आहे. स्वप्नीलचा हा डबस्मॅश व्हिडीओ सोशलमीडियावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित फुगे या चित्रपट आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची केमिस्ट्री फुगे या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्यांची ही केमिस्ट्री घरातील सगळ्याच लोकांना पटते असे नाही. एकूण या चित्रपटाची कथा काय आहे हे प्रेक्षकांना पाहण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पार्टी दे या गाण्याने सोशल मीडियावर कल्ला केलेले दिसत आहे. त्यामुळे पार्टी दे हे गाणेदेखील झक्कास झाले आहे. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत अश्विन आंचन, अर्जुनसिंग बर्हान, कार्तिक निशानदार आणि अनुराधा जोशी यांनी फुगे चित्रपटाची निर्मिती केली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.