सेल्फीमध्ये स्वप्नील जोशी ऐवजी हाच ठरला हिरो, फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 13:35 IST2019-09-21T13:33:30+5:302019-09-21T13:35:12+5:30
या सेल्फीमध्ये स्वप्नील रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. लाल रंगाचा टी शर्ट आणि त्याला मॅचिंग अशी पँट त्याने परिधान केल्याचे या सेल्फीमध्ये दिसत आहे.

सेल्फीमध्ये स्वप्नील जोशी ऐवजी हाच ठरला हिरो, फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू
छोट्या पडद्यावर श्रीकृष्णाची भूमिका साकारत घराघरात पोहचलेला आणि आजच्या तरुणाईचा मराठमोळा लाडका अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. आपल्या विविधरंगी भूमिका आणि अनोख्या स्टाईलनं स्वप्नीलनं तरुणाच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरही स्वप्नीलनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'चेकमेट', 'दुनियादारी', 'मुंबई-पुणे-मुंबई', 'मितवा', 'मोगरा फुलला' अशा विविध चित्रपटांमधून स्वप्नीलने आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. स्वप्नील सोशल मीडियावरही सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो.
स्वतःचे फोटोही तो सोशल मीडियावर शेअर करतो. नुकताच त्याने शेअर केलेला एक सेल्फी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या सेल्फीमध्ये स्वप्नीलपेक्षा त्याच्या मागे दिसणाऱ्या झोपलेल्या पांडाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सेल्फीमध्ये स्वप्नील रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. लाल रंगाचा टी शर्ट आणि त्याला मॅचिंग अशी पँट त्याने परिधान केल्याचे या सेल्फीमध्ये दिसत आहे. त्यावर सनग्लासेसने या लूकला चारचाँद लावल्याचे दिसत आहे. असं असतानाही या सेल्फीमध्ये स्वप्नीलपेक्षा झोपलेल्या पांडाने साऱ्यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत. या सेल्फीवर स्वप्नीलच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे.