‘समांतर 2’नं रचला इतिहास, स्वप्नील जोशीनं दिली आनंदाची बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 05:04 PM2021-07-16T17:04:35+5:302021-07-16T17:05:03+5:30

Samantar 2 : कुमार आणि चक्रपाणी यांच्या ‘समांतर’ आयुष्याचा गुंता आणि अनेक रहस्यांनी रंगलेली ‘समांतर 2’ ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आणि नुसती रिलीज झाली नाही तर या सीरिजनं अक्षरश: धुमाकूळ घातला.

Swapnil Joshi post Samantar 2 crosses 56+ MILLION views on MX Player | ‘समांतर 2’नं रचला इतिहास, स्वप्नील जोशीनं दिली आनंदाची बातमी!!

‘समांतर 2’नं रचला इतिहास, स्वप्नील जोशीनं दिली आनंदाची बातमी!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘समांतर’च्या पहिल्या सीझनचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं होतं. यानंतर दुसरा सीझन दिग्दर्शन समीर विध्वंस यांनी केलं आहे.

कुमार आणि चक्रपाणी यांच्या ‘समांतर’ आयुष्याचा गुंता आणि अनेक रहस्यांनी रंगलेली ‘समांतर 2’ (Samantar 2) ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आणि नुसती रिलीज झाली नाही तर या सीरिजनं अक्षरश: धुमाकूळ घातला. होय, पहिल्या सीझनपेक्षाही या सीरिजचा दुसरा सीझन गाजला. आता या मराठी सीरिजनं  एका विक्रमावर नावं कोरलं आहे. होय, ‘समांतर 2’  ही ओटीवरची आत्तापर्यंत  सर्वाधिक पाहिली गेलेली पहिली मराठी वेब सीरिज ठरली आहे. अगदी काही दिवसात  5 कोटी 60 लाखांवर  प्रेक्षकांनी ही सीरिज पाहिली.
कुमार अर्थात स्वप्नील जोशी (Swapnil Joshi ) यामुळे भारावला नसेल तर नवल. त्यानं ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शिवाय मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभारही मानले आहेत.
‘समांतर 2’ने 5.6 कोटी व्ह्युजचा टप्पा ओलांडला. सर्व टीमचं अभिनंदन आणि प्रेक्षकांचे आभार, असे त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही बातमी शेअर करताना लिहिलं.

‘समांतर’च्या पहिल्या सीझनचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं होतं. यानंतर दुसरा सीझन दिग्दर्शन समीर विध्वंस यांनी केलं आहे. ही सीरिज नामांकित मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित आहे. पहिल्या सीझनमध्ये स्वप्नीलने (कुमार महाजन) नितेश भारद्वाजचा (सुदर्शन चक्रपाणी) शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुदर्शननं त्याचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या सोपवली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या आणि एका मनोरंजक वळणावर येऊन ही कथा संपली होती. त्यामुळे साहजिकच   ‘समांतर 2’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती.

Web Title: Swapnil Joshi post Samantar 2 crosses 56+ MILLION views on MX Player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.