स्वप्निल जोशी बनला निर्माता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 10:28 IST2017-08-08T10:35:26+5:302017-08-09T10:28:04+5:30
'तुला कळणार नाही' हा भन्नाट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नवरा आणि बायकोच्या नात्यातील कंगोरे मांडणाऱ्या या सिनेमात ...

स्वप्निल जोशी बनला निर्माता
' ;तुला कळणार नाही' हा भन्नाट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नवरा आणि बायकोच्या नात्यातील कंगोरे मांडणाऱ्या या सिनेमात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.लग्नानंतरची प्रेमकथा मांडणारा हा सिनेमा दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे.नवरा-बायकोच्या नात्यातील गुजगोष्टी मांडणाऱ्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईटवर मोशन पोस्टर लाँच करण्यात आला.लग्नानंतरच्या जबाबदा-या, अपेक्षा आणि एकमेकांचे स्वभाव जपत संसाराचा गाडा यशस्वीरित्या पुढे चालवणा-या घराघरातील प्रेत्येक नवरा बायकोची कथा यात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी या सिनेमाद्वारे निर्मात्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहे.त्यामुळे स्वप्ना वाघमारे-स्वप्नील जोशी अशी दिग्दर्शक-निर्मात्याच्या केमिस्ट्रीदेखील यात जुळून आली आहे.तसेच श्रेया कदम,अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार या तिकडीने देखील निर्मितीची धुरा सांभाळली आहे.विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती आणि वितरण करणारे जीसिम्ससोबत स्वप्नील जोशी निर्माता म्हणून यापुढील प्रवासात कायम राहणार आहे. तसेच निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार हे सिनेमाचे सहनिर्माते आहेत.राहुल आणि अंजलीची लग्नानंतरची प्रेमकथा सांगणारा हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.मराठीतील या राहुल अंजलीच्या भूमिकेत कोण आहे, हे गुपितच ठेवण्यात आले होते.सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच झालेल्या 'तुला कळणार नाही' या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये या दोघांचा आवाज ऐकू येतो.शिवाय हे आवाज रसिकांच्या परिचयाचे असल्याकारणामुळे मराठीतील हे राहुल- अंजली कोण आहेत? याचा अचूक तर्क सिनेरसिकांनी लावला होता.सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे या चित्रपटात प्रेक्षकांना राहुल-अंजलीच्या भूमिकेत दिसणार आहेत. सोनाली आणि सुबोधची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.