सुयशने केला नावांचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 15:41 IST2016-12-03T15:14:38+5:302016-12-03T15:41:11+5:30
सुयश गेली काही दिवस लहान मुलांसाठी एक सरप्राईज घेऊन येणार असल्याचे सांगत आहे. त्याच्यानुसार ही लहान मुले ० ते ...
.jpg)
सुयशने केला नावांचा उलगडा
स यश गेली काही दिवस लहान मुलांसाठी एक सरप्राईज घेऊन येणार असल्याचे सांगत आहे. त्याच्यानुसार ही लहान मुले ० ते १०० या वयोगटातील आहे. तो हे सरप्राईझ ब्रीथ बॅन्ड सोबत घेऊन येणार आहे. अखेर त्याच्या या सरप्राईजचे पोस्टर सुयशने नुकतेच सोशल मीडियावर टाकले आहे. या फोटोमध्ये सुयश एकदम रॉक आॅन स्टाइलमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे या अभिनेत्याकडून काहीतरी खास ऐकण्यास मिळणार आहे असे वाटते. मात्र नक्की हे काय अजून अदयापही गुलदस्त्यात आहे. पण सुयशने या सरप्राईजमध्ये कोण असणार आहेत यांच्या नावांचा उलगडा केला आहे. प्रेक्षकांच्या या खास गिफ्टचे निर्माते संतोष म्हैसाळकर आहेत. तर याचे संगीतकार व गायक निनाद म्हैसाळकर असून विशाल कदम यांची पटकथा असून दिग्दर्शक प्रथमेश पारकर यांनी केले आहेत. तर छायांकन पराग सावंत आणि विघ्नेश सुर्वे व वेशभूषा राधिका पणशीकर यांनी केली आहे. या संपूर्ण टीमने खूपच खास सरप्राईज प्रेक्षकांसाठी ठेवले आहे. प्रेक्षक या सरप्राईजचे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे. त्याच्या या पोस्टरला प्रेक्षकांनी सोशल मीडियावर भरभरून लाइक्स दिले आहेत. त्याचबरोबर तुझ्या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत असल्याचेदेखील त्याला चाहत्यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे. तसेच त्याला यासाठी खूप शुभेच्छादेखील दिल्या आहेत. यापूर्वी सुयशने का रे दुरावा या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. यानंतर तो स्ट्रॉबेरी या नाटकमधून रंगभूमीवरदेखील पाहायला मिळाला. आता तो पुन्हा एका नव्या मालिकेतेदेखील झळकणार असल्याचे समजत आहे.