हा मराठी सुपरस्टार आता रणवीर सिंहसह शेअर करणार स्क्रीन,‘बॉलिवूडच्या बाजीराव’चेही त्यानं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 14:32 IST2018-06-06T09:02:16+5:302018-06-06T14:32:16+5:30

आपल्या अभिनयाने महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धू अर्थात सिद्धार्थ जाधवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.वैविध्यपूर्ण आणि तितक्याच दमदार भूमिका ...

This superstar will now share Ranveer Singh with the screen, 'Bajirabad's Bajirao' he appreciated | हा मराठी सुपरस्टार आता रणवीर सिंहसह शेअर करणार स्क्रीन,‘बॉलिवूडच्या बाजीराव’चेही त्यानं केलं कौतुक

हा मराठी सुपरस्टार आता रणवीर सिंहसह शेअर करणार स्क्रीन,‘बॉलिवूडच्या बाजीराव’चेही त्यानं केलं कौतुक

ल्या अभिनयाने महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धू अर्थात सिद्धार्थ जाधवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.वैविध्यपूर्ण आणि तितक्याच दमदार भूमिका साकारत सिद्धार्थने आघाडीच्या लोकप्रिय नायकांमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. दमदार अभिनयासह कॉमेडीचं अचूक टायमिंग यामुळे सिद्धू साऱ्यांच आवडता अभिनेता बनला आहे.गेल्या काही दिवसांत एका डान्स रिअॅलिटी शोच्या जजच्या भूमिकेतही तो झळकतो आहे.लवकरच या रिअॅलिटी शोचा अंतिम सामना होऊन त्या शोची सांगता होणार आहे.या शोनंतर सिद्धूने पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दणक्यात एंट्री मारावी अशी त्याच्या फॅन्सची इच्छा होती.त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असंच दिसतंय.कारण सिद्धू लवकरच एका हिंदी सिनेमातून रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या सिनेमात तो बॉलिवूडचा बाजीराव आणि आघाडीचा अभिनेता रणवीर सिंहसह रुपेरी पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे. रणवीरसोबतचा एक फोटो सिद्धूने सोशल मीडियावर शेअर केला आहे.यासोबत लवकरच काहीतरी भन्नाट करणार असल्याचे सांगणारी पोस्ट शेअर केली आहे. रणवीरसह कोणत्या सिनेमात काम करणार हे मात्र त्याने गुलदस्त्यातच ठेवले असून फॅन्सना वेट अँड वॉच म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्याने रणवीर सिंहचंही कौतुक केलं आहे. त्याची एनर्जी जबरदस्त असल्याचे सिद्धूने म्हटले आहे. मराठीतील तुफान एनर्जी असलेला सिद्धू आणि हिंदीतील रणवीर यांनी एकत्र आल्यानंतर रसिकांना मनेरंजनाची धम्माल मेजवानी मिळणार यांत शंका नाही. सिद्धूचा हा काही पहिलाच हिंदी सिनेमा नसून याआधीही त्याने हिंदी सिनेमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. गोलमाल, गोलमाल रिटर्न्स या सिनेमातून त्याने रसिकांना खळखळून हसवलं आहे. त्यामुळे रणवीरसह त्याच्या आगामी सिनेमाची रसिकांना नक्कीच प्रतीक्षा असेल. 


Web Title: This superstar will now share Ranveer Singh with the screen, 'Bajirabad's Bajirao' he appreciated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.