मराठी चित्रपटांसाठी 'सुपरहिट' वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:56 IST2016-01-16T01:07:40+5:302016-02-05T10:56:40+5:30

 2015 वर्षाचा प्रारंभ 'लोकमान्य एक युगपुरुष', क्लासमेट्स, बाळकडू, बाजी, मितवा कॉफी आणि बरंच काही, काकण, व्हॉट अबाउट सावरकर, टाइमपास-२, ...

'Super hit' year for Marathi films | मराठी चित्रपटांसाठी 'सुपरहिट' वर्ष

मराठी चित्रपटांसाठी 'सुपरहिट' वर्ष

 20
15 वर्षाचा प्रारंभ 'लोकमान्य एक युगपुरुष', क्लासमेट्स, बाळकडू, बाजी, मितवा कॉफी आणि बरंच काही, काकण, व्हॉट अबाउट सावरकर, टाइमपास-२, म्हैस, अगं बाई अरेच्चा-२, सिद्धांत अशा काही चित्रपटांनी झाला. वर्षाच्या शेवटी मराठी चित्रपटांनी अक्षरश: बॉलिवूडदेखील दणाणून सोडले. कट्यार काळजात घुसली, मुंबई-पुणे-मुंबई २,ख्वाडा, डबलसीट, दगडी चाळ, शटर, ऑनलाइन बिनलाइन, ढोल ताशे, र्मडर मेस्त्री, बायस्कोप, शॉर्टकट, तू ही रे, बाइकर्स अड्डा, राजवाडे सन्स, परतु, सिंड्रेला, ऊर्फी, कॅरी ऑन, असे एक से एक भन्नाट चित्रपट मराठी इंडस्ट्रीने प्रेक्षकांना दिले. या तुलनेमध्ये गतवर्षी लय भारी, पोस्टर बॉइज, रमा माधवन, रेगे, टपाल, डॉ. प्रकाश बाबा आमटे, इश्क वाला लव, प्यारवाली लव्हस्टोरी, एलिझाबेथ एकादशी, विटीदांडू अशा बोटांवर मोजण्याइतक्याच चित्रपटांनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले.
यंदाच्या वर्षात रवी जाधव व सतीश राजवडे दिग्दर्शित टाइमपास-२, मुंबई-पुणे-मुंबई २ यासांरखे सिक्वेल्सदेखील प्रेक्षकांना भावले. राजवाडे यांनी या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित करण्याची घोषणा करून रसिकांना सुखद धक्काही दिला, तर मागच्या वर्षी फँड्री हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शित केलेल्या नागराज मंजुळे यांचे 'हायवे- एक सेल्फी आरपार' या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दर्शन घडले. 'देऊळ' चित्रपटाबरोबरच प्रवीण तरडे यांच्या यंदा प्रदर्शित झालेल्या 'देऊळबंद' चित्रपटालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
एखादा चित्रपट मराठी असो किंवा हिंदी त्याचे मार्केटिंग उत्तम झाले की, चित्रपटाला हमखास यश मिळते. आता हेच पाहा ना, 'हायवे' हा चित्रपट उमेश आणि गिरीश कुलकर्णी स्टाईलचा असूनही विशेष चालला नाही. 'मुंबई-पुणे-मुंबई 2 आणि 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने सलमानचा 'प्रेम रतन धन पायो'लादेखील टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. मितवा, कॉफी आणि बरचं काही, डबलसीट, दगडी चाळ हे चित्रपटदेखील प्रमोशनच्या फंड्यामुळे भाव खाऊन गेले.
या मराठी चित्रपटांच्या यशाच्या चढत्या आलेखांमुळेच बॉलिवूड कलाकारांनाही मराठी चित्रपटांनी भुरळ पाडली. माधुरी दीक्षित हिने 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट पाहताच चक्क मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा बोलून दाखविली, तर विद्या बालननेदेखील 'एक अलबेला' या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीमध्ये चक्क पदार्पणही केले. सलमान खानदेखील 'लय भारी' या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. खरंच, हे सर्व चित्र पाहता मराठी चित्रपट, दिग्दर्शक,अभिनेता, अभिनेत्री, गायक, संगीतकार या सर्वांचे अभिनंदन तर केलेच पाहिजे.
तसेच, मराठी चित्रपटांना असेच यश मिळत राहो आणि ऑस्करवरदेखील मराठीची मोहोर उमटो, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. यंदाचे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी 'सुपरहिट' धमाका ठरले. तब्बल एक दोन नव्हे, तर दहा चित्रपटांनी 'हाऊसफुल'चा फलक झळकविला, तर त्यातील काही चित्रपटांनी कोटीच्या कोटी उड्डाणे केली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित 'कोर्ट' या चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली; मात्र या चित्रपट निवडीसंदर्भातील ऑस्कर समितीचे अध्यक्ष अमोल पालेकर यांच्या 'पडद्यामाग'चे नाट्य सर्वांनी अनुभवले; परंतु राहुल रवैल आणि इतर सदस्यांनी पालेकरांची पोलखेल केल्यामुळे ऑस्करच्या नामांकनामध्ये कोर्टचा समावेश झाला. ख्वाडानेही राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. मराठी इंडस्ट्रीसाठी यशाची वेगळी पावती दुसरी काय असू शकते? याव्यतिरिक्त प्रेम, कॉमेडी, ऐतिहासिक, मैत्री, कौटुंबिक, सामाजिक अशा विविध विषयांशी संबंधित तब्बल 103 मराठी चित्रपट यावर्षी बॉक्सऑफिसवर उतरले व निम्म्यापेक्षा जास्त चित्रपट यशस्विततेच्या यादीत समाविष्ट झाल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: 'Super hit' year for Marathi films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.