​ सनी देओल - सोनाली पहिल्यांदाच एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 19:07 IST2016-11-28T19:01:26+5:302016-11-28T19:07:34+5:30

श्रेयस तळपदे पोश्टर बॉयज या मराठी चित्रपटाचा रिमेक हिंदीमध्ये करत असल्याचेआम्हीच तुम्हाला सांगितले होते. या चित्रपटात आपल्याला प्रमुख भूमिकेत ...

Sunny Deol - Sonali for the first time together | ​ सनी देओल - सोनाली पहिल्यांदाच एकत्र

​ सनी देओल - सोनाली पहिल्यांदाच एकत्र

रेयस तळपदे पोश्टर बॉयज या मराठी चित्रपटाचा रिमेक हिंदीमध्ये करत असल्याचेआम्हीच तुम्हाला सांगितले होते. या चित्रपटात आपल्याला प्रमुख भूमिकेत देओल ब्रदर्स दिसणार असल्याचे देखील सर्वांना माहित आहे. श्रेयसचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. याशिवाय आपली मराठमोठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही देखील या सिनेमात झळकणार असल्याचे समजतेय. या चित्रपटामध्ये सोनालीने सनी देओलच्या आॅनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारली आहे. पुण्यातील भोर तालुक्यात सिनेमाची शूटिंग सध्या सुरु आहे. मुंबईतही सिनेमाची शूटिंग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एवढेच नाही तर यामध्ये सनी आणि सोनालीने काही इंटीमेट सीन दिले असल्याचे देखील एका वेबसाईटने सांगितले आहे. बॉबी देओलसोबत एक नवी अभिनेत्री प्रेक्षकांना दिसणार आहे. प्रॉडक्शन टीमने या नवीन अभिनेत्रीच्या नावाचा अजुन तरी खुलासा केलेला नाही. सोनालीने या आधी देखील 'दिल चाहता है', 'सिंघम' आणि 'टॅक्सी नं. 9211' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावल्या होत्या. हिंदीसोबतच तिने कन्नड, गुजराती, मराठी आणि तमिळ सिनेमात काम केले आहे. आता या चित्रपटामध्ये ती काय कमाल करतेय हे तर आपल्याला लवकरच समजेल. परंतू प्रेक्षकांना आता सनी आणि सोनालीची जबरदस्त आॅनस्क्रिन केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार हे मात्र नक्की.

Web Title: Sunny Deol - Sonali for the first time together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.