सुनिकेत गांधी यांनी केला 'फिरकी' चित्रपटाविषयीचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 11:19 IST2017-01-20T11:19:50+5:302017-01-20T11:19:50+5:30
कोणताही चित्रपट तयार करताना प्रथम त्या चित्रपटाची कथा निर्मात्याला ऐकवली जाते. त्याचा होकार मिळाला तर तो चित्रपट दिग्दर्शक करण्यास ...

सुनिकेत गांधी यांनी केला 'फिरकी' चित्रपटाविषयीचा उलगडा
क णताही चित्रपट तयार करताना प्रथम त्या चित्रपटाची कथा निर्मात्याला ऐकवली जाते. त्याचा होकार मिळाला तर तो चित्रपट दिग्दर्शक करण्यास सुरूवात करतो. मात्र फिरकी या चित्रपटाची निर्मिती करण्यापूर्वी सर्वात आधी त्या चित्रपटाचा ट्रेलर तयार केला आणि त्या ट्रेलरसहित चित्रपटाची कथा निर्मात्यांना ऐकविल्यानंतर या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली याचा उलगडा या चित्रपटाचे दिग्दर्शक सुनिकेत गांधी यांनी केला. पंधराव्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मराठी सिनेमा टुडे' अंतर्गत 'फिरकी' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यानिमित्त समर नखाते यांनी 'फिरकी'च्या टीमशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी चित्रपटाचे निमार्ते मौलिक देसाई आणि लेखक विशाल काकडे हे उपस्थित होते. दिग्दर्शक सुनिकेत गांधी पुढे म्हणाले, या चित्रपटात एका मुलाची आणि त्याच्या दोन मित्रांची पतंगासंबधी कथा असली तरी चित्रपटाला 'फिरकी' हे नाव 'चक्री' म्हणजेच 'जीवनाचे चक्र' या अर्थाने दिले आहे. या चित्रपटातील ज्येष्ठ कलाकार आणि मुलांची भूमिका करणारे कलाकार यांची कार्यशाळेच्या वेळीच छान गट्टी जमल्यामुळे अभिनयाच्या दृष्टीने काम करून घेणे सुकर झाले असेही त्यांनी सांगितले. तर लेखक विशाल काकडे म्हणाले, प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी संहिता आहे तशीच ठेवली गेली फक्त दिग्दर्शकांच्या सूचनेनुसार त्यामध्ये किरकोळ बदल करण्यात आले. नुकताच १५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवात अनेक आगामी मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये फिरकी या चित्रपटाचादेखील समावेश आहे. या चित्रपटातील अनेक गोष्टींचा उलगडा दिग्दर्शक सुनिकेत गांधी यांनी केला.