मराठी सिनेमांना तीन महिन्यांत अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 07:23 IST2023-03-03T07:22:47+5:302023-03-03T07:23:00+5:30

मराठी चित्रपटांना प्रोत्साहन आणि अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मराठी चित्रपट अनुदान समितीची पुनर्रचना करण्यात आली नसून त्यामुळे २१४ चित्रपटांची स्क्रिनिंग रखडली आहेत.

Subsidy for Marathi films in three months | मराठी सिनेमांना तीन महिन्यांत अनुदान

मराठी सिनेमांना तीन महिन्यांत अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी चित्रपटांच्या अनुदानाबाबत ‘लोकमत’ने मांडलेल्या मुद्द्याची दखल अखेर सरकारकडून घेण्यात आली. मराठी चित्रपटांना अनुदानासाठी एक वर्षाची वाट पाहावी लागणार नाही. यापुढे मराठी चित्रपटांना तीन महिन्यांत अनुदान मिळेल. त्याचबरोबर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांना दुप्पट अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.  

मराठी चित्रपटांना प्रोत्साहन आणि अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मराठी चित्रपट अनुदान समितीची पुनर्रचना करण्यात आली नसून त्यामुळे २१४ चित्रपटांची स्क्रिनिंग रखडली आहेत. याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी तारांकित प्रश्नोत्तराच्या तासाला ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांनी केली. त्याला सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. यावेळी २०२१ आणि २०२२  साली तत्कालीन सरकारने स्थापन करण्यात आलेल्या तीन समित्या बरखास्त करून त्या जागी २५ जानेवारी रोजी नवी अनुदान समिती स्थापन केली आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. चित्रपट अनुदानासाठी सभागृहातील अनेक सदस्यांच्या काही सूचना असल्यामुळे मुनगंटीवार यांनी सर्वांची 
एकत्रित बैठक घ्यावी, अशी सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आली. 

इतर निर्णय असे...
nथीम बेस प्रेरणादायी, ऐतिहासिक चित्रपटांना १ कोटींहून जास्त अनुदान. दोन वर्षांच्या आत निर्मिती झालेल्या चित्रपटांनाच अनुदान मिळणार. 
nअनुदानासाठी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत स्क्रिनिंगसाठी (परीक्षणासाठी) एकच थिएटर आहे. मात्र, आता लवकरच नवे थिएटर्स चित्रपटांच्या स्क्रिनिंगसाठी तयार केले जाणार. 
nतालुकानिहाय चित्रपट प्रेक्षक वाढावा, यासाठी प्रयत्न केले जाणार. मराठी चित्रपटांना वाव मिळावा, यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर भर देऊन विकसित करण्यात येणार.
nनाट्यगृहांमध्ये चित्रपटगृहही निर्माण केली जाणार.

Web Title: Subsidy for Marathi films in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.