​सुबोध भावे पुष्पक विमानद्वारे पुन्हा दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 12:19 IST2017-05-05T06:49:43+5:302017-05-05T12:19:43+5:30

सुबोध भावे हा एक प्रतिभाशाली कलावंत असल्याचे त्याने बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटातून सिद्ध केले आहे. तो केवळ ...

Subodh Bhave plays the role of directors in the Pushpak aircraft | ​सुबोध भावे पुष्पक विमानद्वारे पुन्हा दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

​सुबोध भावे पुष्पक विमानद्वारे पुन्हा दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

बोध भावे हा एक प्रतिभाशाली कलावंत असल्याचे त्याने बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटातून सिद्ध केले आहे. तो केवळ चांगला कलाकारच नाही तर दिग्दर्शकदेखील आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले. या चित्रपटाने अनेक पुरस्कारदेखील मिळवले. या चित्रपटासाठी सुबोधने केलेल्या दिग्दर्शनाचे चांगलेच कौतुक झाले होते. कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर आता सुबोध कोणता चित्रपट दिग्दर्शित करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 
सुबोध लवकरच त्याच्या दुसऱ्या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे घोषित केले आहे. त्याने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटला एक पोस्टर टाकले असून त्यावर पुष्पक विमान असे चित्रपटाचे नाव लिहिले आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध भावे आणि वैभव चिंचाळकर करणार असल्याचे म्हटले आहे. 
सुबोधने या चित्रपटाची घोषणा दादासाहेब फाळके यांच्या जंयतीच्या निमित्ताने केली आहे. या चित्रपटाची कथा काय असणार तसेच या चित्रपटात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असणार, या चित्रपटात सुबोध काम करणार की नाही याबाबत त्याने मौन राखणेच पसंत केले आहे. आता सुबोध या चित्रपटाबाबत पुढील घोषणा कधी करतो याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागलेली आहे. 
सुबोधसोबत या चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव चिंचाळकर करणार आहे. वैभवदेखील आज मराठी चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. त्याने सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या कुलवधू या मालिकेचे दिग्दर्शन केले होते तर दुनियादारी या प्रसिद्ध चित्रपटाचे त्याने संवाद लिहिले होते. 

Web Title: Subodh Bhave plays the role of directors in the Pushpak aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.