'लाल इश्क' चं गुढीपाडव्याचं जोरदार सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 16:16 IST2016-04-06T23:16:06+5:302016-04-06T16:16:06+5:30

 बॉलीवुडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी प्रोडक्शनचा पहिला-वहिला मराठी सिनेमा 'लाल इश्क' गुपित आहे साक्षीला, अशी टॅगलाईन घेऊन लवकरच ...

Strong Celebration of 'Lal Ishq' Chun Gudi Padva | 'लाल इश्क' चं गुढीपाडव्याचं जोरदार सेलिब्रेशन

'लाल इश्क' चं गुढीपाडव्याचं जोरदार सेलिब्रेशन

 
ॉलीवुडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी प्रोडक्शनचा पहिला-वहिला मराठी सिनेमा 'लाल इश्क' गुपित आहे साक्षीला, अशी टॅगलाईन घेऊन लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्ना वाघमारे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात स्वप्नील जोशी सह हिंदी अभिनेत्री अंजना सुखानी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. नुक तेच स्वप्नील व अंजनानी पारंपारीक वेषभूषेत भन्साळी प्रोडक्शनमध्ये गुढीपाडव्याचं जोरदार सेलिब्रेशन केलं. स्वप्निलसोबतच अंजना यावेळी मराठमोळ्या लूकमध्ये खुपच सुंदर दिसत होती.चित्रपटाची संपूर्ण टीम नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. शिरीष लाटकर यांनी या चित्रपटाचे लेखन केलेअसून जयवंत वाडकर, प्रिया बेर्डे, कमलेश सावंत या कलाकारांचा देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.संजय लीला भन्साळींचा पहिला-वहिला मराठी सिनेमा 'लाल इश्क' गुपित आहे साक्षीला... हा चित्रपट २७ मे ला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Strong Celebration of 'Lal Ishq' Chun Gudi Padva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.