दाग हा लघुपट लवकर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 16:42 IST2016-12-20T16:42:41+5:302016-12-20T16:42:41+5:30

सध्या मराठी चित्रपटसृष्ट्रीत लघुपटांचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच नाटकप्रमाणेच कित्येक मराठी कलाकर लघुपट करत असल्याचे दिसत ...

Stain Early ... | दाग हा लघुपट लवकर...

दाग हा लघुपट लवकर...

्या मराठी चित्रपटसृष्ट्रीत लघुपटांचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच नाटकप्रमाणेच कित्येक मराठी कलाकर लघुपट करत असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे कित्येक मराठी कलाकार लघुपट करण्यास कमी वेळ लागत असल्यामुळे, लघुपट करण्यासा प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच एक लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या लघुपटाचे नाव दाग असे आहे. शोभा फिल्म्स प्रॉडक्शनच्यावतीने दाग या लघुचित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या लघुपटाचे चित्रिकरण पुणे येथील ग्रामीण भागात करण्यात आले आहेत. तसेच शहरी भागातदेखील या लघुपटाचे चित्रिकरण झाले आहे. या लघुपटाचा मुहूर्त संतोष सखद यांच्या हस्ते करण्यात आले आहे. संतोष यांनी यापूर्वी फॅड्री आणि सैराट अशा अनेक चित्रपटांची कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या लघुचित्रपटाचे कथा, पटकथा, लेखक प्रदिपकुमार यांनी केले असून दिग्दर्शन तेजस ऐरोडकर यांनी केले आहे. दाग या लघुचित्रपटाचे छायांकन सुर्या मेनन यांनी केले आहे. तसेच सहाय्यक म्हणून चेतन तागडे यांनी काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे साऊंड इंजिनिअर म्हणून प्रकाश निकम व गजानन सुर्यवंशी यांनी केले आहे. लघुचित्रपटाची निर्मिती व्यवस्थापन रवी वाल्मिकी आणि ज्ञानेश्वर साठे यांची मदत मिळाली आहे. या लघुपटामध्ये लगदी शहा, सोनल बनसोडे, रमेश आमले, हिना शहा, सुवर्णा माने, दिव्या पवार, प्रमिला बनसोडे, संजीवनी कुलकर्णी, विष्णु भारती, तेजस ऐरोडकर, अशोक आडगावकर या कलाकारांचा समावेश आहे. या लघुपटातून समाजाला नक्कीच चांगला संदेश पोहोचणार आहे. 
 




 
         



म्

Web Title: Stain Early ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.