​स्वराच्या साक्षीने जूळूनी आल्या रेशीमगाठी ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 11:18 IST2016-12-20T11:18:51+5:302016-12-20T11:18:51+5:30

कला ही कलाकाराचे संपूर्ण जीवन व्यापून टाकते, या कलेतून झपाटलेल्या कलाकारास जळी-स्थळी-आणि पाषाणीही फक्त कलेचाच अंश दिसत असतो. नुकताच ...

Speaking to the vowels, | ​स्वराच्या साक्षीने जूळूनी आल्या रेशीमगाठी ...

​स्वराच्या साक्षीने जूळूनी आल्या रेशीमगाठी ...

ा ही कलाकाराचे संपूर्ण जीवन व्यापून टाकते, या कलेतून झपाटलेल्या कलाकारास जळी-स्थळी-आणि पाषाणीही फक्त कलेचाच अंश दिसत असतो. नुकताच याचा तंतोतंत प्रत्यय आला. महान गायक व अभिनेते किशोरकुमार यांचे चाहते असलेले पुण्याचे प्रसिद्ध गायक जितेंद्र भूरूक यांनी चक्क आपल्या मुलीच्या लग्न समारंभासाठी संगीत व वाद्याच्या साहाय्याने आगळीवेगळी सजावट करून उपस्थितांचे लक्ष वेधले. या सजावटीमुळे समारंभाचा संपूर्ण माहोलच जरा हटके ठरला.

कारण, एरवी लग्नाच्या पाककृतीमध्ये रमणारी समस्त वऱ्हाडी मंडळी या लग्नाच्या मात्र सजावटीकडे पाहूनच अचंबित होत होती. स्वागत कक्षेपासून ते वधू-वरांच्या व्यासपीठापर्यंतचा सारा परिसरच जणू संगीतमय होता. अभिजात संगीत कलेला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांची स्वागत कक्षेत पोर्टेट उभारण्यात आली होती. तर भव्य व्यासापीठाला साजेशा अशा वीणा, सतार, हार्मोनिअम, तबला, गिटार, संवादिनी आदी पारंपारिक वाद्यवृंदांच्या प्रतिमांनी सर्वांनाच ‘येड’ लावले. जुन्या पद्धतीचे रेकॉर्डस आणि नव्या पद्धतीच्या सीडी गुंफून तयार करण्यात आलेली अनोखी तोरणे उपस्थितांना विशेष भावत होती. वाद्यप्रेमींसाठी तर स्वतंत्र कक्षच तयार करण्यात आला होता. या कक्षेत जावून कोणालाही वाद्य वाजवण्याची मुभा होती. त्यामुळे वाद्यप्रेमींसाठी तर ही मेजवानीच ठरली. आकर्षक प्रकाशयोजनेमुळे या स्वरमयी वातावरणाला चारचाँद लावले. एका कलाकाराने कलेला अशा स्वरूपात अभिवादन केल्याची बहुदा ही पहिलीच घटना असल्याने या लग्नाचा साक्षीदार ठरलेल्या प्रत्येकालाच एक विलक्षण कलाकृतीचा अनुभव घेता आला.

किशोर कुमार यांचे जबरदस्त चाहते असलेले जितेंद्र भूरूक यांना पुण्याचे किशोरकुमार असेही संबोधले जाते. अशा अवलिया कलाकाराची दखल नुकतीच मध्यप्रदेश सरकारने घेतली होती. मध्यप्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून त्यांना सन्मानित करण्यात आले होते.  

Web Title: Speaking to the vowels,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.