मराठी चित्रपटाच्या गाण्यांनीही पाडली रसिकांना भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:44 IST2016-01-16T01:07:41+5:302016-02-05T10:44:44+5:30
आजवरच्या मराठी चित्रपटांचा इतिहास पाहता मराठी गाण्यांचा नव्या पिढीला विशेष गंध नसायचा; पण हल्ली मराठी चित्रपटाचे यश पाहता काहीशा ...

मराठी चित्रपटाच्या गाण्यांनीही पाडली रसिकांना भुरळ
जवरच्या मराठी चित्रपटांचा इतिहास पाहता मराठी गाण्यांचा नव्या पिढीला विशेष गंध नसायचा; पण हल्ली मराठी चित्रपटाचे यश पाहता काहीशा गाण्यांमुळे चित्रपट हिट ठरल्याचे दिसते. वर्षाची सुरुवात समाधानकारक झाली नसली, तरी शेवट मात्र मराठी चित्रपटातील गाण्यांनीं 'गोड' केला. अगदी शास्त्रीय संगीतापासून रोमॅन्टिक किंवा धागडधिंगाड घालणार्या गाण्यांनीही रसिकांना भुरळ घातली. जसे की 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'घेई छंद मकरंद', 'सूर निरागस हो', 'सुरत पिया की' या गाण्यांना तर प्रेक्षकांनी अगदी काळजातच साठवून ठेवले. याशिवाय प्रेमातच पाडणार्या दगडी चाळमधील धागा धागा, मुंबई-पुणे-मुंबई २ मधील साथ दे तू मला.. या सुपरहिट गाण्यांनी 'रिंगटोन'ची जागा मिळविली. यातच मराठी लोकांना लग्नसराई असो किंवा गणपती विसर्जन असो, यासाठी एक तर नवीन, हटके व जल्लोषपूर्ण गाणे डान्स करायला लागतेच. ही जागा भरून काढली ती पोपट पिसाटला, ओ मारिया, गुलाबाची कळी, बँड बाजा, मोरया, तुझ्या रूपाचं चांदण या गाण्यांनी.