​आदर्शच्या या गाण्याने भावूक झाली बायको

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 15:18 IST2017-01-28T09:48:09+5:302017-01-28T15:18:09+5:30

 मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक म्हणजे आदर्श शिंदे. आतापर्यंत आदर्शने अनेक मराठी चित्रपटांना आपल्या भारदस्त आवाजाने एक नवीन ओळख करुन ...

This song of Adarsh ​​got emotional | ​आदर्शच्या या गाण्याने भावूक झाली बायको

​आदर्शच्या या गाण्याने भावूक झाली बायको

 
राठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक म्हणजे आदर्श शिंदे. आतापर्यंत आदर्शने अनेक मराठी चित्रपटांना आपल्या भारदस्त आवाजाने एक नवीन ओळख करुन दिली आहे. आता पुन्हा एकदा आदर्शने बघतोस काय मुजरा कर या चित्रपटातील एका गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. माझ्या राजा रं... माझ्या शिवबारं... हे आदर्शने गायलेले गाणे सध्या चांगलेच गाजत आहे. आदर्शचा आवाज थेट काळजाला भिडणारा असल्याने त्याची प्रत्येक गाणीच सुपरहिट होतात. संगीतकार अमितराज आणि आदर्श शिंदे या दोघांची जोडी देखील सुपरहिट आहे. आजवर अनेक धडाकेबाज गाणी या जोडीने मराठी चित्रपटांना दिलेली आहेत. परंतू आदर्शने जेव्हा माझ्या शिवबा रं हे गाणे गायले तेव्हा त्याच्या बायकोला ते गाणे ऐकुन रडू कोसळले. याविषयी संगीतकार अमितराज सांगतो, आदर्शला नेहमीच एक सवय आहे तो जेव्हा कोणतंही गाण रेकॉर्ड करतो तेव्हा ते त्याच्या बायकोला ऐकवतो. माझ्या शिवबाला गाणं गायल्यानंतर त्यानी रात्री घरी जाऊन बायकोला ऐकवले. त्याच्या बायकोचा मला त्याच रात्री फोन आला आणि ती ढसाढसा फोनवर रडली. ती म्हणाली, अमित तु काय गाण गाऊन घेतलयस आदर्श कडून. बास तीचे ते शब्द आणि रडणंच सर्व काही भावना व्यक्त करीत होते. एवढेच नाही तर मला आनंद शिंदे यांनी देखील फोन करुन गाण छान झाल्याचे सांगितले होते. आता हे गाणे सर्वांनाच आवडत असल्याने या गाण्याला सध्या सगळीकडेच हिट्स मिळत आहेत. 

Web Title: This song of Adarsh ​​got emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.