सोनारिकाला मराठी चित्रपटांची आॅफर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 16:02 IST2016-11-08T16:02:02+5:302016-11-08T16:02:02+5:30
देवो के देव महादेव या मालिकेतून सोनारिका भडोरिया हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेत ती ...

सोनारिकाला मराठी चित्रपटांची आॅफर?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; line-height: normal; font-size: 12.8px;"> देवो के देव महादेव या मालिकेतून सोनारिका भडोरिया हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेत ती पार्वतीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तिची ही भूमिका अजून ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याचबरोबर सोनारिकाने अनेक तामिळ चित्रपट देखील केले आहे. आता ती, साँसे या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. तिचा हा चित्रपट हॉरर असणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत हितेन तेजवानी आणि रजनीश दु्ग्गल देखील पाहायला मिळणार आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पौराणिक मालिकेनंतर ती थेट हाॅरर चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. मालिका, बाॅलिवुड, तामिळ चित्रपट पाहता सोनारिकाची गाडी सुसाट निघाली असल्याचे दिसत आहे. आता अशा या अभिनेत्रीला मराठी चित्रपटांचे देखील आॅफर येत असल्याचे समजत आहे. तिला एक दोन नाही तर तब्बल तीन मराठी चित्रपटांच्या आॅफर येत असल्याचे कळत आहे. तसेच तिने आता तामिळ चित्रपटानंतर आपला मोर्चा मराठी चित्रपटांकडे वळवणार का हे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे.