​ सोनाली झाली कोल्हापुरी मिरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 11:43 IST2016-12-03T11:43:06+5:302016-12-03T11:43:06+5:30

 मराठमोळी मुलगी सोनाली राऊत पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटामध्ये आयटम साँग करणार असल्याचे आता सर्वांनाच माहित आहे. सोनालीच्या या आयटम ...

Sonalya Koli Kolhapuri Chilli | ​ सोनाली झाली कोल्हापुरी मिरची

​ सोनाली झाली कोल्हापुरी मिरची

 
राठमोळी मुलगी सोनाली राऊत पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटामध्ये आयटम साँग करणार असल्याचे आता सर्वांनाच माहित आहे. सोनालीच्या या आयटम साँगचे बोल आता उलगडले आहेत. एवढेच नाही तर तिचे काही फोटोज देखील व्हायरल झाले आहेत. लिपस्टिक लगा के म्हणत प्रेक्षकांना आपल्या अदाकारीचा जलवा दाखवणारी सोनाली आता आर.पी.जी प्रोडक्शन प्रस्तुत व राजश्री गायकवाड निर्मित हिरो या आगामी मराठी सिनेमातल्या आयटम सॉंगवर अभिनेता भूषण पाटील सोबत थिरकली आहे. या आयटम सॉंगचे चित्रीकरण नुकतेच चित्रनगरीमध्ये संपन्न झाले. एन.एन सिद्दिकी या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत आहेत. मिरची कोल्हापूरची असे बोल असलेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे. निखिल कोटीभास्कर यांनी लिहिलेलं हे भन्नाट आयटम सॉंग रेशमा सोनावणे हिने आपल्या ठसकेबाज आवाजात गायलं असून निखिल कोटीभास्कर, सेमल यांच संगीत या गाण्याला लाभलं आहे. या आयटम सॉंगच्या निमित्ताने किंगफिशर कॅलेंडरचे ग्लॅमर मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. हिरो चित्रपटातील सोनालीचा हा हॉट अंदाज मराठी चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार हे नक्की. या गाण्यातील सोनालीचा लुक देखील एकदम हटके आहे. या चित्रपटाचे सहनिमार्ते अनिस मोराब आहेत. हिरो चित्रपटात रमेश देव, विजय पाटकर, उदय टिकेकर, भूषण पाटील, वैष्णवी कर्मारकर यांच्या भूमिका आहेत.
 
 

 

Web Title: Sonalya Koli Kolhapuri Chilli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.