/> बॉलीवुडची सोज्वळ ब्युटी क्वीन सोनाली बेंद्रे ही मराठमोळी आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहितीये. अग बाई अरेच्चा या चित्रपटातील छम छम करता या गाण्यामध्ये तिने ठुमके लावले खरे पण सोनालीला मराठी चित्रपटात अभिनय करताना पाहण्याचे भाग्य तर तिच्या चाहत्यांना अजुन तरी मिळाले नाही. मग म्हणतात ना दुधाची तहान काही वेळेस ताकावर भआगवावी लागते, असे काही तिच्या चाहत्यांना सध्या म्हणावे लागेल कारण सोनाली आता मराठमोळ््या लुकमध्ये पहायला मिळत आहे. सोनालीचा पारंपारीक अस्सल ठसकेबाज मराठमोळ््या लुकमधील एक फोटो सोशल साईटवर वायरल होत आहे. या फोटोला तिच्या चाहत्यांकडुन देखील अॅप्रिशिएट केले जातेय. लाल रंगाच्या घागºयामध्ये सोनाली एकदम स्टनिंग दिसत आहे. कानात झुमके, गळ््यात साज, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, बिंदी, हातात बांगड्या अशा पारंपारीक वेषात सजलेली सोनाली खुपच सुंदर दिसत आहे. लवकरच ती आपल्याला मराठी चित्रपटात दिसावी अशी आपण आशा करुयात.
Web Title: Sonali's Maratha Look
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.