सोनाली कुलकर्णीचे नवीन वर्षाचे पहिले फोटोशुट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 18:23 IST2017-01-02T18:23:36+5:302017-01-02T18:23:36+5:30

प्रत्येक व्यक्तीचा अगदी जिव्हाळयाचा विषय म्हणजे फोटो. जिथे जाऊ तिथे फोटो काढू हा जीवनाचा नियमच बनला आहे. त्यामुळे सेल्फी ...

Sonali Kulkarni's new year's first photo shoot | सोनाली कुलकर्णीचे नवीन वर्षाचे पहिले फोटोशुट

सोनाली कुलकर्णीचे नवीन वर्षाचे पहिले फोटोशुट

रत्येक व्यक्तीचा अगदी जिव्हाळयाचा विषय म्हणजे फोटो. जिथे जाऊ तिथे फोटो काढू हा जीवनाचा नियमच बनला आहे. त्यामुळे सेल्फी आणि पाउट पोझ काढणे याची क्रेझदेखील निर्माण झाली आहे. मात्र प्रत्येक व्यक्ती हा फोटो मनोरंजनासाठी अथवा आठवणी म्हणून काढत असतो. मात्र कलाकारांच्या आयुष्यात फोटोचे अधिकच महत्व असतात. त्यांच्या कामासाठी फोटोशुट करणे हा त्यांच्या कामाचा भाग असतो. म्हणून प्रत्येक कलाकार काही टप्प्याने फोटोशुट करत असल्याचे पाहायला मिळत असतात. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेदेखील नुकतेच फोटोशुट केले आहे. तिने नवीन वर्षाची सुरूवातच अत्यंत झक्कास फोटोशुटने केले आहे. तिचे फोटोशुट अत्यंत हॉट आणि कूल अंदाजात आहेत. तिने तिच्या या फोटोशुटचे काही फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहे. तिच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर हॉट, कूल आणि बहुत खूब म्हणत तिच्या या सौदर्याचे कौतुकदेखील तिच्या चाहत्यांनी कमेंन्टच्या माध्यमातून केले आहे. तिचे हे सुंदर फोटो तेजस नेरूरकर याने कॅमेरात कैद केले आहे. तसेच नवीन वर्षाची नवीन सुरूवात असल्याचे तिने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याचबरोबर तिने आपल्या या पोस्टमधून तेजस नेरूरकर याचेदेखील आभार मानले आहे. सोनालीने नेहमीच बॉलिवुड आणि मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिने अगं बाई अरेच्चा २, डॉ. प्रकाश बाबा आमटे, पुणे ५२, देऊळ, रिंगा रिंगा असे अनेक मराठी चित्रपट केले आहेत. 

Web Title: Sonali Kulkarni's new year's first photo shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.